शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

गडचिरोलीत महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:14 IST

महिलांच्या आरोग्याला घेऊन नागपुरातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये अद्ययावत उपचार उपलब्ध आहेत, त्यातुलनेत गडचिरोली जिल्हा खूपच मागे पडला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांच्या सामान्य रोगाचेही निदान होत नाही. याविषयी परिचारिकांनाही विशेष प्रशिक्षण प्राप्त नसल्याने समस्यात भरच पडते. शिवाय, महिलांमध्ये महिलांच्या आजाराविषयी जागृती नसल्याने आजाराचा धोका वाढत असल्याचे मत, सर्च संस्था गडचिरोलीच्या सहनिदेशिका डॉ. राणी बंग यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्दे राणी बंग : इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅनेस्थेशियालॉजिस्टचा पदग्रहण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महिलांच्या आरोग्याला घेऊन नागपुरातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये अद्ययावत उपचार उपलब्ध आहेत, त्यातुलनेत गडचिरोली जिल्हा खूपच मागे पडला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांच्या सामान्य रोगाचेही निदान होत नाही. याविषयी परिचारिकांनाही विशेष प्रशिक्षण प्राप्त नसल्याने समस्यात भरच पडते. शिवाय, महिलांमध्ये महिलांच्या आजाराविषयी जागृती नसल्याने आजाराचा धोका वाढत असल्याचे मत, सर्च संस्था गडचिरोलीच्या सहनिदेशिका डॉ. राणी बंग यांनी येथे व्यक्त केले.इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅनेस्थिशियालॉजिस्ट, नागपूर शाखेचा पदग्रहण सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅनेस्थिशियालॉजिस्ट महाराष्टÑ राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. हितेंद्र महाजन उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅनेस्थिशियालॉजिस्ट, नागपूर शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुनीता लवंगे व सचिव डॉ. उमेश रामतानी यांनी पदभार स्वीकारला.डॉ. बंग म्हणाल्या, गडचिरोली ग्रामीण रुग्णालयात केवळ दोन स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ आहेत. बधिरीकरण तज्ज्ञ तर नावालाही नाही. यामुळे शस्त्रक्रियांवर याचा प्रभाव पडतो, असे भयानक चित्र आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनांचाही लाभ गडचिरोलीतील रुग्णांपर्यंत पोहोचत नाही. कारण अनेकांकडे या योजनेतील रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी पैसा नसतो. शासनाने या सर्व समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.प्रास्ताविक मावळत्या सचिव डॉ. गौरी अरोरा यांनी केले तर गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती मावळते अध्यक्ष डॉ. शीतल दलाल यांनी दिली. येत्या वर्षभरात आयोजित करण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाची माहिती डॉ. सुनीता लवंगे यांनी दिली. आभार डॉ. उमेश रामतानी यांनी मानले.-बधिरीकरण तज्ज्ञ पडद्यामागील कलावंतडॉ. बंग म्हणाल्या, बधिरीकरण शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळेच दुर्गम भागातही यशस्वीरीत्या सर्जरी करणे शक्य झाले आहे. हे डॉक्टर पडद्यामागील कलावंत आहेत. भूलतज्ज्ञ म्हणजे माणसाशी माणसासारखं नातं जपणारा डॉक्टर आहे, असे म्हणत त्यांनी समाजात डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला असल्याचे सांगून, बधिर झालेल्या समाजाला जागृत करण्याचे कार्यही प्रत्येकाने हाती घेण्याचे आवाहनही केले.

टॅग्स :Healthआरोग्यWomenमहिला