शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीकडून डिजिटल इंडियाला वाकुल्या; कॅशलेस व्यवहाराला थारा नाही, रोख असेल तरच पायरी चढा

By नरेश डोंगरे | Updated: September 12, 2022 16:38 IST

रोख पैसे द्या अन् एसटीत या असा सरळ सरळ हिशेब एसटीने ठेवला आहे.

नागपूर : महानगरांसोबत छोट्या-छोट्या खेड्यांत दिमाखाने धावणारी, महाराष्ट्राच्या नागरिकांची लाडकी लालपरी ७५ वर्षांची झाली आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षांत वाटचाल करणाऱ्या लालपरीने वेगवेगळ्या नावाने अनेकदा स्वत:त बदल करून घेतले असले तरी एसटीनेडिजिटल इंडियाला मात्र अद्याप थारा दिला नाही. कॅशलेस पेमेंटला एसटी वाकुल्या दाखवत फिरत आहे. रोख पैसे असेल तरच पायरी चढा, अशी आजही एसटीची भूमिका आहे.

नोटबंदी अन् नवे चलन येण्याची प्रक्रिया देशात सुरू झाल्यापासून डिजिटल इंडियाचा नारा देशभर बुलंद झाला. प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक विभागात कॅशलेस व्यवहाराला सुरुवात झाली. महानगरेच नव्हे तर गावखेड्यातही मोठमोठे, बहुतांश व्यवहार कॅशलेस होऊ लागले. कुठे १० रुपयांचा चहाही घ्यायचा असेल तर कॅशलेसची सुविधा मिळते.

विमानापासून, टॅक्सीपर्यंत गुगल पे, फोन पे करा अन् प्रवास करा, अशी सुविधा उपलब्ध झाली. ऑटोवालेही ग्राहकांसमोर गुगल, फोन पे चे ऑप्शन देतात. एसटी महामंडळ मात्र अजूनही डिजिटल इंडियाला वाकुल्या दाखवत आहे. येथे गुगल, फोन पे तर सोडाच, कोणते कार्डही स्वॅप होत नाही. बसमध्ये प्रवास करायचा असेल तर रोखीशिवाय पर्याय नाही. रोख पैसे द्या अन् एसटीत या असा सरळ सरळ हिशेब एसटीने ठेवला आहे.

अनेकदा बदलले रूप

राज्यातील ९२ टक्के गावात लालपरी पोहोचली आहे. उन्हाळा असो, पावसाळा असो, की हिवाळा, ती १२ महिने तेवढ्याच उत्साहाने धावते. प्रवाशांची ने-आण करण्यासाठी अहोरात्र सज्ज असते. गेल्या काही वर्षांत तिने पारंपरिकता जोपासताना अनेकदा कात टाकून आपले रुपडे बदलले आहे. त्याचाच भाग म्हणून कधी ती एशियाड झाली. कधी शिवनेरी तर कधी शिवशाही बनली. आता अत्याधुनिक अशा शिवाईच्या रूपातही धावत आहे.

पेमेंट ऑप्शनबाबत ‘तोच तो पणा’

प्रवाशांना अधिक आरामदायक प्रवासाची सुविधा देण्याचा दावा करणाऱ्या एसटी महामंडळाने पेमेंट ऑप्शनच्या बाबतीत मात्र ‘तोच तो पणा’ अवलंबला आहे. त्यामुळे अनेक प्रवासी एसटीकडे पाठ फिरवत आहेत. या संबंधाने एसटीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता लवकरच कॅशलेसचे ऑप्शन उपलब्ध होणार असल्याचे अधिकारी सांगतात.

टॅग्स :state transportएसटीdigitalडिजिटलMONEYपैसा