आयएफएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By Admin | Updated: February 5, 2017 02:22 IST2017-02-05T02:22:38+5:302017-02-05T02:22:38+5:30
राज्य शासनाने वन विभागातील नऊ आयएफएस अधिकाऱ्यांचे बदली आदेश जारी केले आहेत.

आयएफएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
नऊ अधिकाऱ्यांचा समावेश : उमेश अग्रवाल एफडीसीएमचे नवे एमडी
नागपूर : राज्य शासनाने वन विभागातील नऊ आयएफएस अधिकाऱ्यांचे बदली आदेश जारी केले आहेत. यात काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे तर काहींची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. शनिवारी जारी करण्यात आलेल्या बदली आदेशानुसार महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे (एफडीसीएम) मुख्य महाव्यवस्थापक उमेश अग्रवाल यांची येथेच व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नतीसह नियुक्ती करण्यात आली आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण) डॉ. विनय सिन्हा यांना महाराष्ट्र राज्य जैवविविध मंडळावर सदस्य सचिव म्हणून पाठविण्यात आले आहे. शिवाय अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) के. एन. खवारे यांची प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) येथे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. पी. एन. मुंडे यांची महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) बी. पी. सिंग यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण) येथे, एफडीसीएमचे महाव्यवस्थापक आर. एस. यादव यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) येथे, मुख्य वनसंरक्षक (वनसंवर्धन) अरविंद पाटील यांची मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर येथे आणि वनसंरक्षक सामाजिक वनीकरण, पुणे एम. एम. कुलकर्णी यांची मुख्य वनसंरक्षक (कार्य आयोजना) पुणे, येथे बदली करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)