इच्छा असेल तर अंतिम संस्कारासाठी पैसे द्या!

By Admin | Updated: July 10, 2015 02:52 IST2015-07-10T02:52:32+5:302015-07-10T02:52:32+5:30

शहरातील दहन घाटावर मनपातर्फे अंतिम संस्काराची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे.

If you wish, then pay the last sermon! | इच्छा असेल तर अंतिम संस्कारासाठी पैसे द्या!

इच्छा असेल तर अंतिम संस्कारासाठी पैसे द्या!


नागपूर : शहरातील दहन घाटावर मनपातर्फे अंतिम संस्काराची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. याचा सर्वांनाच लाभ मिळतो. परंतु सधन व्यक्तींना या सवलतीची गरज नसल्याचे निदर्शनास आले आहे. गरज नसतानाही हा खर्च होत असल्याने इच्छा असेल तर अंतिम संस्कारासाठी लाकडे विकत घेण्याच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
जुन्या कंत्राटदाराचा दरकरार संपला आहे. पुन्हा दोन वर्षांसाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे नवीन कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. वर्षाला ५,४०० टन लाकडाची गरज भासते. यावर ३.०५ कोटी रु. खर्च होतो. एका अंतिम संस्कारासाठी ३०० किलो लाकूड व १० किलो गोवऱ्या लागतात. दहन घाटाचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. यात सेवाभावी संस्थांना सहभागी करण्याचा मनपाचा विचार असल्याचे समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी सांगितले.
कन्हान जलविद्युत प्रकल्पाला देण्यात येणाऱ्या ९ टीएमसी पाणी यातून नागपूर शहर व मेट्रोरिजनला पाणीपुरवठा करण्याची योजना जलसंपदा विभागाने तयार केली आहे. हे पाणी जीवनी खापा येथील प्रस्तावित उर्ध्व प्रकल्पात सोडण्यात येईल.
येथून ते पाईपलाईनद्वारे अमरावती मार्गावरील वेणा जलाशयात आणले जाणार आहे. यासाठी या प्रकल्पाची उंची वाढविली जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च मनपा व नासुप्र यांनी प्रत्येकी ५० टक्के करण्याच्या प्रस्तावाला समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
६ जून २०१२ च्या स्थायी समितीच्या बैठकीत जीवनी खापा प्रकल्पात नागपूर शहर व मेट्रोरिजनसाठी पाणी आरक्षित ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या प्रकल्पाद्वारे दररोज ७०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. परंतु वेणा जलाशयाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्यासाठी या प्रकल्पाची उंची वाढविण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: If you wish, then pay the last sermon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.