प्रवाशांसाठी जोरजोरात ओरडाल तर होईल दीड हजारांचा दंड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2022 20:23 IST2022-08-22T20:22:58+5:302022-08-22T20:23:26+5:30
Chandrapur News प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी रिक्षाचालक जोरजोरात ओरडताना दिसून येत. मात्र असे केल्यास दीड हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

प्रवाशांसाठी जोरजोरात ओरडाल तर होईल दीड हजारांचा दंड !
चंद्रपूर : रेल्वेस्थानक, बसस्थानक, सरकारी दवाखाना, जटपुरा गेट आदी ठिकाणी प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी रिक्षाचालक जोरजोरात ओरडताना दिसून येत. मात्र असे केल्यास दीड हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकते. त्यामुळे २० रुपयांच्या प्रवाशांसाठी ओरडणे चांगलेच महागात पडू शकते.
प्रवाशांचा सुरळीत प्रवास व्हावा, यासाठी वाहतूक पोलिसांनी काही नियमावली तयार केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी अनेक गर्दीच्या, सार्वजनिक ठिकाणी जोरा-जोरात ओरडून तसेच वाहनचा हाॅर्न वाजवून लक्ष वेधून घेण्यात येते. मात्र सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार असे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. पूर्वी असे करणाऱ्यांवर दोनशे रुपये दंडाची तरतूद होती. मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. दुसऱ्यांदा नियमभंग केल्यास दीड हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद केली आहे.
रेल्वे स्थानक, बसस्थानकावरील गोंधळ
चंद्रपुरातील रेल्वेस्थानक येथे केव्हा ट्रेन येते केव्हा सुटते याबाबतची माहिती रिक्षाचालकांना असते. हे रिक्षाचालक गाडी आल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या दारात प्रवाशांसाठी गोंधळ घालत असतात.
शहरातील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे येथे ऑटोचालक मोठी गर्दी करत असून ओरडताना नेहमीच दिसून येतात.
आता पहिल्यांदा गुन्हा केल्यास ५००, दुसऱ्यांदा दीड हजार
प्रवाशांसाठी ओरडल्यास कायदा दुरुस्तीपूर्वी २०० रुपये दंड होता. तो दंड आता ५०० रुपये करण्यात आला आहे. या नियमाचा दुसऱ्यांदा भंग केल्यास संबंधित वाहनचालकाला दीड हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.
आधी होता २०० रुपये दंड
वाहतूक अधिनयमानुसार प्रवाशांसाठी आरडाओरड करणे हे कायद्याने नियमभंग आहे. पूर्वी असे आढळून आल्या २०० रुपये दंड होता आता तो वाढविण्यात आला आहे.
पोलिसांकडून अनेकदा कारवाई
n रेल्वेस्थानक किंवा बसस्थानक परिसरात ऑटोरिक्षावाले प्रवाशांसाठी ओरडताना दिसल्यास बऱ्याचदा वाहतूक पोलीस त्यांना तेथून हटवतात. अनेकदा कारवाईही केली