शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

शिक्षक आहात तर विद्यार्थ्यांपेक्षाही बेशिस्त का वागता? उपसभापतींनी घेतला शिक्षक आमदारांचा ‘क्लास’

By योगेश पांडे | Updated: December 14, 2023 22:46 IST

प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाल्यानंतर पहिलाच प्रश्न विनाअनुदानित व अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांना प्रचलित पद्धतीने अनुदान देण्याबाबतचा होता. विक्रम काळे, जयंत आसगावकर, किरण सरनाईक आदी सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

नागपूर : विधानपरिषदेत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या काही आमदारांचा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भर सभागृहात चांगलाच ‘क्लास’ घेतला व त्यांना शिस्तीचे धडेच दिले. एकाच प्रश्नाला शिक्षकआमदार वारंवार उपप्रश्न विचारून लांबवत होते. त्यामुळे इतर प्रश्नांना न्याय मिळणार कसा, अशी भूमिका घेत उपसभापतींनी शिक्षक आमदारांच्या बेशिस्त वागणुकीवर नाराजीदेखील व्यक्त केली. तसेच शिक्षक आमदार असूनदेखील विद्यार्थ्यांपेक्षा बेशिस्त का वागता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाल्यानंतर पहिलाच प्रश्न विनाअनुदानित व अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांना प्रचलित पद्धतीने अनुदान देण्याबाबतचा होता. विक्रम काळे, जयंत आसगावकर, किरण सरनाईक आदी सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. १२.४० वाजता हा प्रश्न पुकारण्यात आला होता. विक्रम काळे यांनी उपप्रश्न विचारण्याअगोदर वेळ घेत सविस्तर मांडणी केली. त्यांना तेव्हापासूनच वेळेचे भान ठेवा, असे उपसभापतींनी बजावले. त्यानंतर जयंत आसगावकर यांनी उपप्रश्न विचारला. तर कपिल पाटील यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरावरच हरकत घेतली. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर तपासून घेऊ, असे सांगितल्यावर देखील पाटील आक्रमक झाले. चार ते पाच शिक्षक आमदारांनी प्रश्न विचारल्यावर देखील उपप्रश्नसाठी गोंधळ होत होता. अखेर यावर उपसभापतींनी त्यांना सुनावले, ‘मंत्री उत्तर देत असताना सारखे उभे राहणे बरोबर नाही. तुम्ही बोलायला लागले की थांबतच नाहीत. एका शिक्षक आमदाराला बोलायला दिले तर दुसरे नाराज होतात. स्वत:च्या क्षेत्राशी निगडित प्रश्न असतो तेव्हा आमदारांना ४० मिनिटे देखील कमी पडतात, मात्र दुसऱ्यांचा प्रश्न असेल तर नियम दाखवून हरकत घेतात’, या शब्दांत उपसभापतींनी सुनावले.

- सभागृहात दादागिरी करायची नाही...उपसभापतींनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना बोलण्याची परवानगी दिली. मात्र, पदवीधर मतदारसंघाचे सदस्य अभिजित वंजारी यांनी जागेवर बसूनच याला विरोध केला व खाली बसण्यास सांगितले. यावरून उपसभापती संतापल्या, ‘वंजारी तुमच्यासारख्या सदस्याला अशी वागणूक शोभत नाही, अशी दादागिरी करू नका, कुणी बोलावे आणि बसायचे हे तुम्ही सांगायचे नाही’, या शब्दांत वंजारींना दटावले.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेVidhan Parishadविधान परिषदTeacherशिक्षकMLAआमदार