शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या मार्गाने चालाल तर कधीच अपयशी होणार नाही - सरन्यायाधीश डॉ. डी.वाय. चंद्रचूड 

By आनंद डेकाटे | Updated: February 11, 2023 15:08 IST

विधि विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ

नागपूर : संविधानाने सांगितलेल्या मार्गाने चालाल तर जीवनात कधीच अपयश येणार नाही, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश न्या. डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी येथे केले. महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.

वारंगा, बुटीबोरी येथे विधि विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात आयोजित दीक्षांत समारंभाच्या वेळी देशाचे माजी सरन्यायाधीश व विद्यापीठाचे संस्थापक कुलपती न्या. शरद बोबडे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे कुलपती न्या. भूषण गवई, प्र-कुलपती व मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश न्या. संजय गंगापूरवाला, न्या. सुनील शुक्रे, न्या. अतुल चांदूरकर, न्या. अनिल किलोर, न्या. भारती डांगरे, इंडियन बार असोसिएशनचे अध्यक्ष मनन मिश्रा, एडओकेत जनरल वीरेंद्र सराफ तसेच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजेंदर कुमार व कुलसचिव डाॅ. आशिष दीक्षित उपस्थित होते. 

२२० विध्यार्थ्यांना पदवी प्रदान, २५ विद्यार्थाना सुवर्णपदक

शैक्षणिक सत्र २०१६ पासून राष्ट्रीय विधि विद्यापीठाची बॅच सुरू झाली आहे. त्यानंतर कोरोनामुळे शैक्षणिक सत्रावर परिणाम झाला होता. त्यामुळे विधि विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ यावर्षी होत आहे. यामध्ये एल.एल.बी. पदवीच्या दोन बॅच आणि एल.एल.एम. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पाच बॅचेसच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यात पदवीच्या दोन बॅचमध्ये एल.एल.बी. झालेल्या १५८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यासह २०१६ ते २०२० पर्यंतच्या पाच बॅचमधील ५६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर एल.एल.एम. पदवी प्रदान करण्यात आली. याशिवाय ६ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी शैक्षणिक सत्रात सर्वोत्तम ठरलेल्या विद्यार्थ्यांना २५ सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले.

टॅग्स :Educationशिक्षणDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडnagpurनागपूरuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी