शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Pahalgam Terror Attack : दोन मिनिटांचा उशीर झाला असता तर...; रक्तरंजित हल्ल्यातून वाचले नागपुरकर कुटुंब

By योगेश पांडे | Updated: April 23, 2025 02:32 IST

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात जीव वाचविताना महिलेचा पाय फ्रॅक्चर...

नागपूर : मिनी स्वित्झर्लंड असलेल्या बैसरन व्हॅलीत निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घ्यायला गेलो होतो. मात्र अचानक गोळ्यांचा आवाज सुरू झाला अन किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला. काय करावे, कुठे जावे याचाच कुठलाच अंदाज येत नव्हता. पती व मुलासोबत स्वत:ला वाचविण्यासाठी फक्त पहाडाच्या दिशेने धावायचे इतकेच कळत होते. जर बैसरन व्हॅलीच्या घटनास्थळावरून निघायला दोन मिनिटांचा उशीर झाला असता तर काहीही घडू शकले असते. शरीरातील वेदना अन डोळ्यातील भिती, संपूर्णपणे हादरलेल्या नागपुरकर सिमरन रुपचंदानी यांच्या शब्द अन शब्दांतून पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची दहशत स्पष्टपणे जाणवून येत होती. सिमरन या पती तिलक व मुलगा यांच्यासोबत पहलगामला गेल्या होत्या. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्यांचा जीव थोडक्यात बचावला. मात्र त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

जरीपटका येथील निवासी असलेले रुपचंदानी कुटुंब जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाला गेले होते. मिनी स्विट्झर्लंड अशी ओळख असलेल्या बैसरन व्हॅलीत जाण्याचे प्लॅनिंग त्यांनी अगोदरपासूनच केले होते. तेथून परत जाण्यासाठी ते प्रवेशद्वारावर आले असता अचानक गोळीबार सुरू झाला. गोळीबार कुठून होत आहे, कोण करत आहे याचा कुठलाच अंदाज त्यांना येत नव्हता. त्यावेळी सर्व लोकांनी वाचण्यासाठी पहाडाकडे धाव घेतली. रुपचंदानी कुटुंबानेदेखील जीव मुठीत घेऊन धावायला सुरुवात केली. पहाडावर जाताना सिमरन यांचा पाय घसरला व त्या जखमी झाल्या. त्या अवस्थेत त्यांचे पती व मुलाने त्यांना सावरले व सुरक्षित ठिकाणी ते घेऊन गेले. जर त्यांनी समयसूचकता दाखवत पहाडाकडे धाव घेतली नसती तर त्यांनादेखील गोळ्या लागू शकल्या असत्या.

फक्त किंकाळ्या अन आक्रोश - गोळीबार सुरू झाल्यानंतर बराच वेळ तर केवळ आम्ही धावतच होतो. काही पर्यटकांचे नातेवाईक मागे सुटले, मात्र त्यांना परत घ्यायला जाणे म्हणजे मृत्यूच्या जबड्यात जाण्यासारखे होते. सर्वत्र केवळ किंकाळ्या अन आक्रोश ऐकू येत होता. आम्ही वाचू की नाही याची शाश्वती नव्हती. मात्र परमेश्वराच्या कृपेने आम्ही वाचलो अशी भावना सिमरन यांनी व्यक्त केली. सिमरन यांच्या पायाला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे.

कुठून गोळ्या आल्या कळलेच नाही घटनास्थळी चार ते पाच हजार पर्यटक होते. रुपचंदानी कुटुंबाने घोडा बुक करून पहलगाममध्ये पर्यटन केले. त्यानंतर ते बैसन व्हॅलीमध्ये पोहोचले. अचानक गोळीबार सुरू झाला, मात्र गोळ्या कुठून येत आहेत हे कळत नव्हते. एक्झिटचा दरवाजा चार फुटांचाच होता व पहाडाकडे जाताना पत्नी जखमी झाली. पत्नी व मुलगा सुरक्षित रहावा हेच माझ्या डोक्यात होते, अशी भावना सिमरन रुपचंदांनी यांच्या पतीने व्यक्त केली.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला