शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा कोरा होणार नसेल तर महाआघाडीशी संबंधाचा विचार करू : देवेंद्र भुयार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 22:57 IST

राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, ही आमची मागणी आहे. या मागणीसाठीच आम्ही या सरकारच्या समर्थनात आहे. मात्र ती पूर्ण होणार नसेल तर महाविकास आघाडीशी आमचा काहीच संबंध राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, ही आमची मागणी आहे. या मागणीसाठीच आम्ही या सरकारच्या समर्थनात आहे. मात्र ती पूर्ण होणार नसेल तर महाविकास आघाडीशी आमचा काहीच संबंध राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर दिला.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शिवसेनेच्या वचननाम्यात सातबारा कोरा करू, असा उल्लेख होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वचनाला जागणारे होते. दुर्दैवाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कर्जमाफीच्या घोषणेत मात्र हे दिसले नाही. सातबारा कोरा होईल, असा शेतकऱ्यांना विश्वास होता. दुष्काळग्रस्त शेतकरी या अधिवेशनाकडे आस लावून बसला होता. मात्र तशी घोषणा न झाल्याने काल होते तसेच आजही शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण कायम आहे.मुंबईत मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सरकारने आपल्या घोषणेसंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा द्यावा, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सूचना करणार आहे.भुयार पुढे म्हणाले, १७ हजार कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. ते प्राप्त झाले तर मदत निश्चित होईल, अशी आशा आहे. सातबारा कोरा व्हावा, ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्याचा विचार सरकारने करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :MLAआमदारFarmerशेतकरी