शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोशियारी समितीच्या शिफारसी लागू केल्या नाहीत तर नोटावर मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:33 IST

भगतसिंह कोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू करण्यासह ३१ मे २०१७ चे बेकायदा परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी ईपीएस-९५ निवृत्ती वेतनधारकांकडून गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी ‘नो कोशियारी नो व्होट’ असा नारा देत कोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू केल्या नाही तर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांऐवजी ‘नोटा’वर मतदार करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.

ठळक मुद्देईपीएस-९५ निवृत्ती वेतनधारकांचा इशारा : पाच राज्यात दिसला प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भगतसिंह कोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू करण्यासह ३१ मे २०१७ चे बेकायदा परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी ईपीएस-९५ निवृत्ती वेतनधारकांकडून गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी ‘नो कोशियारी नो व्होट’ असा नारा देत कोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू केल्या नाही तर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांऐवजी ‘नोटा’वर मतदार करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.नुकत्याच पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्या. यातील तीन राज्यात भाजपाचा पराभव झाला असून, काँग्रेस सरकार स्थापन करीत आहे. या राज्यात मतदानावर नजर टाकली तर राजस्थानमध्ये १.३ टक्के व मध्य प्रदेशात १.४ टक्के मतदान नोटावर झाले आहे. मतदारांनी नोटावर मतदान केल्याने भाजपाचे उमेदवार पराभूत झाल्याचा दावा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केला आहे. नोटाचा वापर करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने ईपीएस-९५ चे निवृत्तिधारक व त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे, असे ईपीएस-९५ चे संयोजक प्रकाश पाठक यांनी सांगितले. निवृत्ती वेतनधारकांच्या देशभरात झालेल्या सभांमध्ये कोशियारीच्या शिफारशी नाही तर मतदानही नाही, असा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, २०१४ मध्ये निवडणुकीच्या वेळी भाजपाच्या नेत्यांनी सत्तेवर आल्यास ९० दिवसांच्या आत कोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन होऊन साडेचार वर्षे लोटून गेली असताना आश्वासन पाळले गेले नाही. अनेक आंदोलने झाली, उपोषणही झालेत तरी सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप पाठक यांनी केला. त्यामुळे ईपीएस-९५ च्या निवृत्ती वेतनधारकांनी प्रत्येक निवडणुकीत नोटाचा उपयोग करण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत याचा प्रभाव पडल्याचा दावा त्यांनी केला.सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही तर येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीतही निवृत्त वेतनधारक नोटाचा वापर करतील व याचा मोठा प्रभाव निकालात दिसून येईल, असा इशारा पाठक यांनी दिला. येत्या १९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे निवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन होणार असून, यावेळी ‘नो कोशियारी नो व्होट’ हा नारा गाजणार असल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.

 

टॅग्स :agitationआंदोलनEmployeeकर्मचारी