खोदकामात वीज वाहिनी तुटल्यास गुन्हा दाखल करू : ऊर्जामंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 09:41 PM2018-09-14T21:41:40+5:302018-09-14T21:47:21+5:30

If the power cable is broken down in digging, then you should file a FIR: Energy Minister Bawankule | खोदकामात वीज वाहिनी तुटल्यास गुन्हा दाखल करू : ऊर्जामंत्री बावनकुळे

खोदकामात वीज वाहिनी तुटल्यास गुन्हा दाखल करू : ऊर्जामंत्री बावनकुळे

Next
ठळक मुद्देविकास कामे करणाऱ्या संस्थांना इशारालोकमत इम्पॅक्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विकास कामांसाठी खोदकाम करताना संबंधित संस्थेने वीज कंपनीला माहिती देणे आवश्यक आहे. असे न केल्यास खोदकामात भूमिगत वीज वाहिनी तुटल्यास किंवा क्षतिग्रस्त झाल्यास मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत विविध विकास कामे करणाऱ्या संस्थांना दिला.
नागपूर शहरात सध्या विकास कामे जोरात सुरु आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व मेट्रोच्या कामामुळे ठिकठिकाणी खोदकाम सुरु असते. परंतु हे खोदकाम होत असताना महावितरणच्या भूमिगत वीज वाहिन्या तुटण्याचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. या विषयावर महावितरण व मेट्रोमध्ये अनेकदा वादही होत असतात. यासंबंधात पत्रकारांनी ऊर्जामंत्र्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, विविध विकास कामांसाठी रस्त्यांवर खोदकाम केले जाते. खोदकाम करीत असताना संबंधित संस्थेने महावितरणला माहिती देणे आवश्यक आहे. परंतु याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. मेट्रोला यासंबंधात दोन वेळा निर्देश सुद्धा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासबंधात नव्याने निर्देश देण्यात येतील. यापुढे खोदकाम करताना भूमिगत वीज वाहिनीचे नुकसान झाल्यास संबंधितांविरुद्ध थेट गुन्हेच दाखल केले जातील, असे ते म्हणाले.
यासोबतच वीज आहे परंतु फिडर बंद आहे, असे प्रकारही सुरू आहेत. याचा फटका सामान्य वीज ग्राहकांना सोसावा लागतो. तेव्हा वीज असूनही फिडर बंद असेल तर संबंधित शाखा अभियंत्यांना जबाबदार धरले जाईल असेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले.

१७८ ठिकाणी ६.८७ कोटीचे केबल क्षतिग्रस्त
लोकमतने २९ आॅगस्ट रोजीच्या अंकात विकास कामांमुळे होत असलेल्या वीज नुकसानाचा मुद्दा उपस्थित केला होता. यात मार्च २०१७ पासून आतापर्यंत १७८ ठिकाणी ६.८७ कोटी रुपयाच्या वीज केबलचे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. यामध्ये वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनीने नुकसान भरपाईची मागणी केली असून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

वीज चोरणाऱ्या गणेश मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल होणार
शहरात ११५१ गणेश मंडळांपैकी केवळ १०१ मंडळांनीच अधिकृत वीज कनेक्शन घेतल्याबाबत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, सार्वजनिक पेंडॉलसाठी लागणारी वीज चोरी केली जाते. यावर उपाय म्हणून महावितरणने मंडळांसाठी अत्यल्प दरात वीज जोडणी देण्याची योजना सुरू केली आहे. इतके करूनही मंडळांकडून वीज चोरी केली जात असेल, तर महावितरण कारवाईसाठी सज्ज आहे. यासाठी भरारी पथक स्थापन केले असून ते कारवाई करतील. वीज चोरी पकडल्या गेल्यास गुन्हे दाखल होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आजही तुटले केबल, २० हजार ग्राहक अंधारात
विकास कामांच्या खोदकामात वीज केबल तुटण्याचा प्रकार शुक्रवारीही सुरूहोता. मेट्रोतर्फे बिनाकी परिसरात करण्यात आलेल्या खोदकामात उप्पलवाडी सब स्टेशन येथून निघालेले ३३ केवी बिनाकी फिडरचे केबल तुटले. यामुळे जवळपास २० हजार ग्राहकांची वीज सहा तास गायब होती. केबल तुटल्यामुळे तांडापेठ, मुदलीयार ले-आऊट, लालगंज, दही बाजार, मंगळवारी येथील वीज ग्राहकांना फटका बसला. विशेष म्हणजे नागपूर मेट्रोने आतापर्यंत केबल तोडून वीज वितरण फेन्चाईजी एसएनडीएलचे ९० लाख रुपयचे नुकसान केले आहे. मेट्रोने अजूनपर्यंत भरपाई दिलेली नाही.

Web Title: If the power cable is broken down in digging, then you should file a FIR: Energy Minister Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.