लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) यांच्यावतीने काॅंग्रेसला दहा जागा मागण्यात आल्या आहेत. काॅँग्रेसचे विधिमंडळ नेते आ. विजय वडेट्टीवार आणि काॅंग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांची भेट घेऊन रिपाइंच्या इच्छुक उमेदवारांची यादी सुद्धा सोपवण्यात आली आहे. सकारात्मक चर्चा झाली. परंतु दोन दिवसात निर्णय न झाल्यास रिपाइं स्वबळावर लढेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
रिपाइंचे नागपूर विभागाचे अध्यक्ष प्रकाश कुंभे, शहर कार्याध्यक्ष क्षितीज गायकवाड, शहर महासचिव रजत महेशगवळी, शहर सचिव अश्वजीत गायकवाड, नितेश मेश्राम, सुरेश खोब्रागडे, निखील मेश्राम, मनोज वासनिक आदीनी काॅंग्रेसच्या दोन्ही नेत्यांची भेट घेऊन जागां सदर्भात चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे कुंभे यांनी सांगितले. पुढील दोन दिवसात याबाबत काही निर्णय झाला नाही किंवा सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीतर रिपाइं समविचारी पक्षांसोबत निवडणुकीला सामोरे जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : RPI (Gavai) seeks ten seats from Congress for Nagpur municipal elections. Failure to agree within two days may result in RPI contesting independently or with like-minded parties, warned RPI Nagpur President Prakash Kumbhe after meeting Congress leaders.
Web Summary : आरपीआई (गवई) ने नागपुर नगर निगम चुनाव के लिए कांग्रेस से दस सीटों की मांग की है। प्रकाश कुंभे ने चेतावनी दी कि दो दिनों में समझौता न होने पर आरपीआई अकेले या समान विचारधारा वाले दलों के साथ चुनाव लड़ सकती है।