शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

नासुप्रला पुन्हा नियोजन प्राधिकरण केल्यास रस्त्यावर उतरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 01:11 IST

नासुप्रची पुन्हा नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केल्यास याविरोधात शहरातील नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा महापौर संदीप जोशी व भाजपचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रवीण दटके यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषेदत दिला.

ठळक मुद्देजोशी-दटके यांचा इशारा : पालकमंत्र्यांनी पत्र पाठविणे दुर्दैवी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराचा सत्यानाश करणाऱ्या नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) बरखास्तीची प्रक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरू झाली. त्यानुसार नगर रचना विभाग महापालिकेला हस्तांतरित करण्यात आला आहे. असे असताना पालकमंत्री नितीन राऊत यांनी नासुप्रची पुन्हा नियोजन प्राधिकरण नेमणूक करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. हा प्रकार दुर्दैवी आहे. नासुप्रची पुन्हा नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केल्यास याविरोधात शहरातील नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा महापौर संदीप जोशी व भाजपचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रवीण दटके यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषेदत दिला.नासुप्रने शहरातील रस्ते, नाले, मैदाने विकून खाल्ली, शहरातील नागरिकांना वेठीस धरले. चार ते पाच विश्वस्त निर्णय घ्यायचे. १ रुपया चौरस फूट दराने शासनाच्या जमिनी लाटण्यात आल्या. विशेष म्हणजे नासुप्रच्या अधिकार क्षेत्रातील ५७२ व १९०० आणि २३०० ले-आऊ ट भागात नगरसेवकांना विकास कामे करता येत नव्हती. शहरातील सर्वसामान्य नागरिकांची अडचण विचारात घेता, सर्वपक्षीय नगरसेवकांनी नासुप्र बरखास्त करण्याची मागणी केली होती. महापालिकेच्या प्रस्तावानुसार फडणवीस सरकारच्या काळात नासुप्र बरखास्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच पालकमंत्री नितीन राऊ त यांनी नासुप्रच्या पुनरुज्जीवनासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. त्या आधारे महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी अशोक खांडेकर यांनी महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून, या प्रकरणाशी संबंधित स्वयंस्पष्टता अहवाल आदेश सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.महाविकास आघाडी सत्तेत येताच शहराचा सत्यानाश करणाऱ्या नासुप्रचे पुनरुज्जीवन करणे हे महाआघाडीचे महापाप ठरेल, असे दटके म्हणाले. नासुप्र शहरातील विकासाबाबत इच्छुक नाही. महापालिकेने वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही नासुप्रने १ लाख ९० हजार फाईल्सपैकी केवळ ५,७०० फाईल्स दिल्या. नासुप्र आजवर काँग्रेस नेत्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण राहिल्याचा आरोप संदीप जोशी यांनी केला.महापालिका आयुक्तांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे अहवाल सादर करण्यापूर्वी तो सभागृहात चर्चेसाठी आणावा, त्याशिवाय तो शासनाकडे पाठवू नये, अशा आशयाचे पत्र महापालिका प्रशासनाला दिले असल्याची माहिती जोशी यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासagitationआंदोलन