कोहलीविना भारत जिंकल्यास वर्षभर आनंद साजरा करेन : क्लार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:30+5:302020-12-02T04:11:30+5:30
विराट पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पत्नीच्या बाळंतपणाच्या वेळी तिच्याजवळ उपस्थित राहण्यासाठी भारतात परत येणार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत भारत यजमान ...

कोहलीविना भारत जिंकल्यास वर्षभर आनंद साजरा करेन : क्लार्क
विराट पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पत्नीच्या बाळंतपणाच्या वेळी तिच्याजवळ उपस्थित राहण्यासाठी भारतात परत येणार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत भारत यजमान संघाला कसोटी मालिकेत पराभूत करू शकेल का, असा जाणकारांना प्रश्न पडला आहे. हे आव्हान फारच कठीण असल्याचे काहींचे मत आहे.
क्लार्कच्या मते, विराटचे स्थान कुणीही घेऊ शकणार नाही. विराटचे नेतृत्व आणि फलंदाजी विजयासाठी उपयुक्त आहे. लोकेश राहुल याला अशा परिस्थितीत खेळण्याचा अनुभव असेलही, पण तो विराटचे स्थान घेईल का? मला व्यक्तिश: अजिंक्य रहाणे आवडतो. त्याचे नेतृत्वदेखील चांगले वाटले. तो चांगला खेळाडूदेखील आहे. पण विराटचे स्थान तोदेखील घेऊ शकणार नाही. अजिंक्यने विराटच्या अनुपस्थितीला संधी समजून लाभ घ्यावा. अजिंक्यने विराटच्या अनुपस्थितीत भारताने विजय साजरा करणे ऐतिहासिक कामगिरी ठरणार आहे. भारतीय खेळाडूंनी स्वत:वर विश्वास ठेवून खेळा. ऑस्ट्रेलियाला हरविण्याचे संघात सामर्थ्य आहेच. मात्र त्यासाठी आव्हान स्वीकारून खेळावे लागणार असल्याचे क्लार्क म्हणाला.