शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

... जणू इथे कोरोना अजिबात शिरलेला नाही.. पहाटेपर्यंत सुरू असतात पार्ट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 10:27 IST

सूर्यास्त होताच महामार्गावरील ढाब्यांमध्ये झगमगाट सुरू होतो. एक एक करत चारचाक्या, दुचाक्या थांबायला लागतात. जेवणाचे ऑर्डर देऊन बिनधास्त दारूच्या बाटल्या फोडल्या जातात आणि संबंधित ग्राहक पेंगत नाही तोवर हा झगमगाट सुरू असतो.

ठळक मुद्देमालक, ग्राहकांना आरोग्याची चिंताच नाहीअवैध मार्गाने वाहतोय दारूचा लोटप्रशासनाची डोळ्यावर पट्टी

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे रेस्टॉरंट्स, ढाबे बंद असताना महामार्गावर मात्र सर्रासपणे प्रशासनाच्या डोळ्यासमोर नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. महामार्गावरील ढाबे रात्रीच्या अंध:कारात बिनधास्त सुरू आहेत. रात्री ८ वाजतापासून सुरू होणारी गर्दी दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय होईपर्यंत कायम असते. ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून हा प्रकार उघड झाला आहे.रेस्टॉरंट, ढाबे यांना पार्सल डिलिव्हरी करिताच परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ढाबे संचालकांनी सरकारच्या या सूचनांना ‘अनफॉलो’ करत मनमानी कारभार करण्यास सुरुवात केली आहे. सूर्यास्त होताच महामार्गावरील ढाब्यांमध्ये झगमगाट सुरू होतो. एक एक करत चारचाक्या, दुचाक्या थांबायला लागतात. जेवणाचे ऑर्डर देऊन बिनधास्त दारूच्या बाटल्या फोडल्या जातात आणि संबंधित ग्राहक पेंगत नाही तोवर हा झगमगाट सुरू असतो. पहाटे ५ वाजतापर्यंत हा झगमगाट, जेवणाचे ऑर्डर्स आणि चिअर्सचा आवाज अवैध मार्गाने गुंजत असतो.असे केले ‘स्टिंग ऑपरेशन’गेल्या आठवड्याभरापासून आऊटर रिंगरोड, नागपूर-जबलपूर महामार्गावरील ढाब्यांवर झगमगाट सुरू असल्याची माहिती मिळताच ‘लोकमत’च्या चमूने टेहळणी सुरू केली. शुक्रवारी आणि शनिवारच्या रात्री याच महामार्गावरील ग्रीन व्हॅली हायवे रेस्टॉरंट अ­ॅन्ड ढाबा, त्रिमूर्ती ढाबा, हिंदुस्थान ढाबा, शेरे-ए-पंजाब सरदारजी का ढाबा येथे ग्राहक म्हणून भेट देण्यात आली. तेथील वेटर्सशी चर्चा केल्यानंतर सर्व सरकारी यंत्रणांना सेट करून हे ढाबे सुरू असल्याचे उघडकीस आले. रात्री २ वाजतापर्यंत थांबल्यानंतरही ग्राहकांचा ओघ सुरूच होता. सकाळी ५ वाजतापर्यंत हे ढाबे सुरू असतात, ही माहितीही यावेळी प्राप्त झाली. अनेक ग्राहक चक्क पत्नी, मुले यांच्यासोबत रात्री १२ वाजतापर्यंत ढाब्यांवर पार्ट्या उडवत असल्याचे दिसत होते. केवळ मित्र मंडळीच नव्हे तर कौटुंबिक पार्ट्याही ढाब्यांवर रंगत आहेत.पोलिसांकडून सोयीस्कर दुर्लक्षमहामार्गावर सातत्याने पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन टेहळणी करत असते. मात्र, या दोन दिवसात एकही व्हॅन या भागात भटकलेली नाही. शिवाय ढाबे सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असतानादेखील कुठलीही कारवाई झालेली नाही.दारूचे दाम दुप्पटसंध्याकाळी ५ वाजतापर्यंतच वाईन शॉप सुरू ठेवण्याची परवानगी आहे. शिवाय, बीअर बारला केवळ पार्सल सुविधा सुरू ठेवण्याचे आदेश आहे. मद्यशौकिनांसाठी ढाब्यांवर मद्याचा प्रचंड मोठा साठा करण्यात आला आहे. पोलिसांची कारवाई होऊ नये यासाठी एका ढाब्यावर हा साठा जवळच एका खड्ड्यात पुरुन ठेवण्यात आला आहे, हे विशेष.‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा‘सॅनिटायझर’ आणि ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ची व्यवस्था एकाही ढाब्यावर दिसून आली नाही. एवढेच नव्हे तर स्वयंपाकी आणि वेटर्स यांच्या डोक्याला कॅप नव्हती, हाताला मोजे नव्हते आणि तोंडाला मास्कही नव्हता. टेबल पुसणारे क्लॉथही एकच आणि तो सर्व टेबल्सवर फेरल्या जात होता. एकूणच कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावातही कुठलीच काळजी घेतली जात नव्हती, असे दिसून आले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस