शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही पटली नाही ‘त्या’ मृतदेहाची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 23:17 IST

कोरोना रुग्णांसाठी तयार करून ठेवलेल्या विशेष कोचमध्ये बुधवारी एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली. नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर ही घटना उघडकीस आली. साधारण महिनाभरापासून हा मृतदेह येथे असावा, असा अंदाज असून अद्यापही हा मृतदेह कोणाचा आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना रुग्णांसाठी तयार करून ठेवलेल्या विशेष कोचमध्ये बुधवारी एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली. नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर ही घटना उघडकीस आली. साधारण महिनाभरापासून हा मृतदेह येथे असावा, असा अंदाज असून अद्यापही हा मृतदेह कोणाचा आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.कोरोनासाठी रेल्वे विभाग सज्ज आहे. गरज पडल्यास उपाययोजना म्हणून रेल्वेने कोरोना संशयितांसाठी रेल्वेचे कोच तयार ठेवले होते. हे संपूर्ण कोच नागपूर रेल्वेस्थानकाच्या यार्डात ठेवले होते. बुधवारी सकाळच्या सुमारास संपूर्ण कोच स्वच्छ करण्यासाठी वाहशिंग यार्डात आणले असता प्रचंड दुर्गंधी पसरली. रेल्वे कर्मचाऱ्यांना संशय येताच त्यांनी या घटनेची माहिती आरपीएफ नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाकडून लोहमार्ग पोलीस मुख्यालयाला ही माहिती दिली. अमृतसर गाडीच्या (कोच नंबर १३२२३) बर्थखाली हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. लोहमार्ग पोलिसांनी आणि रेल्वे डॉक्टरांनी घटनास्थळी भेट दिल्यावर आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास हेड कॉन्स्टेबल ऑज्वेल थॉमस यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. लोहमार्ग पोलिसांनी गुरुवारी दिवसभर शोध घेण्याचा प्रयत्न करूनही तो कोणाचा आहे, याची माहिती मिळू शकली नसल्याची माहिती ठाणेदार सतीश जगदाळे यांनी दिली.ऑज्वेल थॉमस यांनी कुजलेल्या मृतदेहाचा केला पंचनामाया कुजलेल्या पार्थिवाला हात लावण्यासाठी कोणीही पुढे जात नव्हते. दुर्गंधीमुळे घटनास्थळी उभे राहणेही कुणाला शक्य नव्हते. अशा स्थितीत हेड कॉन्स्टेबल ऑज्वेल थॉमस यांनी पीपीई किट घालून मृतदेहाचा पंचनामा केला.८ वर्षापूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती२०१२ साली राजनांदगाव येथून इतवारी रेल्वेस्थानकावर आलेल्या एका गाडीत मृतदेह होता. नंतर यातील काही कोच वेगळे करून ते मोतीबाग येथे आणल्या गेले. महिनाभराने प्रचंड दुर्गंधी सुटल्यावर ही घटना उघडकीस आली. या कोचमधील मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. विशेष म्हणजे तेव्हाही मृताची ओळख पटली नव्हती.

टॅग्स :Deathमृत्यूrailwayरेल्वे