भाजपाची मानसिकता ओळखा

By Admin | Updated: October 10, 2014 00:57 IST2014-10-10T00:57:28+5:302014-10-10T00:57:28+5:30

भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला धर्मनिरपेक्ष संबोधित असले तरी, ते पक्के जातीयवादी आहे. असा आरोप अनुसूचित जाती आयोगाचे माजी अध्यक्ष पी. एल. पुनिया यांनी केला.

Identify the mentality of the BJP | भाजपाची मानसिकता ओळखा

भाजपाची मानसिकता ओळखा

पी.एल. पुनिया : भीमशक्तीचा मेळावा
नागपूर : भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला धर्मनिरपेक्ष संबोधित असले तरी, ते पक्के जातीयवादी आहे. असा आरोप अनुसूचित जाती आयोगाचे माजी अध्यक्ष पी. एल. पुनिया यांनी केला. त्यामुळे भाजपाची मानसिकता ओळखा असे आवाहन त्यांनी जनतेला केले. पूर्व नागपूर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या समर्थनात हिवरीनगर येथे भीमशक्तीतर्फे घेण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भीमशक्तीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष माजी नगरसेवक अ‍ॅड. यशवंत मेश्राम तसेच प्रमुख अतिथी म्हणून पी.एल. पुनिया व माजी खासदार विलासराव मुत्तेमवार उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदशर््ान करताना अ‍ॅड. अभिजित वंजारी म्हणाले की, मी उच्चशिक्षित असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अभ्यासक आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांबद्दल मला अतिशय अभिमान असून राज्यघटनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मी आग्रही आहे. याप्रसंगी विलासराव मुत्तेमवार म्हणाले की, जनता मोदींच्या स्वप्नांना बळी पडली आणि मतदारांनी मोदींचे सरकार निवडून आणले, आता पश्चाताप करीत आहे. मेळाव्याचे प्रास्ताविक भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष राजेश देशभ्रतार यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत बंडू बोरकर, चक्र वर्ती मेश्राम यांनी केले. याप्रसंगी शहराध्यक्ष बाबा बन्सोड, राम गाडेकर, अनिल मेश्राम, सुदाम घरडे, लीलाबाई प्रधान, सुदाम बागडे, आतिष खेळकर, नरेंद्र ढोबळे, शोभा यशवंत मेश्राम, बावाजी लोणारे, मंदा चंदनखेडे, गोवर्धन सहारे, राजकुमार सोनवने, बबलू गजभिये,केबलवाले, अनिल काळे, मुकेश शेंडे, संगिता बावणे, नंदलाल यादव, राजकुमार वासनिक, निर्मला देशभ्रतार, जिया मेंढेकर, झबिल बोरकर, मो. निजाम, अहमद हुसेन, अन्वरभाई, मो. इद्रीस, कैलास वालोंद्रे, शंकर शेंदरे, शैलेश बोरकर, रमेश शेंडे, गीता मेश्राम, वसंता गडपायले, रामु खोब्रागडे, हदीसभाई, तुलाराम अडकने, कुमुद धारगावे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Identify the mentality of the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.