घोरपड-शिरपूर ग्रा.पं.वर आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:40 IST2021-02-05T04:40:14+5:302021-02-05T04:40:14+5:30

घोरपड-शिरपूर ग्रा.पं.वर आदर्श ग्रामविकास आघाडीचा झेंडा कामठी : कामठी तालुक्यातील घोरपड-शिरपूर गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपसमर्थित आदर्श ग्रामविकास आघाडीने नऊही ...

Ideal on Ghorpad-Shirpur village | घोरपड-शिरपूर ग्रा.पं.वर आदर्श

घोरपड-शिरपूर ग्रा.पं.वर आदर्श

घोरपड-शिरपूर ग्रा.पं.वर आदर्श

ग्रामविकास आघाडीचा झेंडा

कामठी : कामठी तालुक्यातील घोरपड-शिरपूर गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपसमर्थित आदर्श ग्रामविकास आघाडीने नऊही जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली. या निवडणुकीत माजी सरपंचाने आत्याच्या विजयासाठी महाविकास आघाडीकडे पाठ फिरविल्याने आदर्श ग्रामविकास आघाडीचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे.

वाॅर्ड क्रमांक १ मध्ये भाजप समर्थित आदर्श ग्रामविकास आघाडीचे नीलेश ढोणे, अनिकेत वानखेडे, आशा करूळकर, वाॅर्ड क्रमांक २ मध्ये प्रकाश खांडेकर, गीता पांडे, सुनीता कार्वेकर तर वॉर्ड क्रमांक ३ मध्ये चुरशीच्या लढतीत आदर्श ग्रामविकास आघाडीचे तारा कडू यांनी ४५९ मते घेत हरीश मेश्राम यांचा ३०८ मताने पराभव केला. मेश्राम यांना १५१ मते मिळाली. याच वाॅर्डातून भारती मानमुंडरे, राजपल्लवी जयस्वाल याही विजयी झाल्या.

Web Title: Ideal on Ghorpad-Shirpur village