शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘इडा-पिडा, माशी-मोंगशे... घेऊन जा गे मारबत’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:24 IST

स्वत:तच वेगळेपणा जपणारे आणि नागपूरची स्वत:ची अशी ओळख म्हणून प्रसिद्ध असणारे दोन उत्सव शनिवारी परंपरेनुसार साजरे होणार आहेत. एक आहे, तान्हा पोळा... हा सोहळा नागपूरकर भोसले घराण्याचीच देण आहे तर, दुसरा मारबत महोत्सव..

ठळक मुद्देमारबत-बडग्या : आरिष्टविरोधी सांकेतिक गर्जना आज होणारतान्हा पोळा : बालकांच्या दाटीवाटीने लाकडी नंदींची भरणार जत्रा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:तच वेगळेपणा जपणारे आणि नागपूरची स्वत:ची अशी ओळख म्हणून प्रसिद्ध असणारे दोन उत्सव शनिवारी परंपरेनुसार साजरे होणार आहेत. एक आहे, तान्हा पोळा... हा सोहळा नागपूरकर भोसले घराण्याचीच देण आहे तर, दुसरा मारबत महोत्सव.. जो इंग्रजांविरोधातील प्रतिकात्मक क्रांतीचे द्योतक आहे. हे दोन्ही महोत्सव शनिवारी परंपरेनुसार साजरे होणार आहेत आणि त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. 

भोसले राजघराण्यातील एका वंशजाने राजद्रोह करत कपटी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती. त्याचा निषेध म्हणून मारबत महोत्सव आकाराला आला. मात्र, त्या काळात इंग्रजी राजवटीशी उघड उघड संघर्ष करणे शक्य नसल्याने, महाभारतातील श्रीकृष्ण व राक्षशिण पुतना मावशीच्या कथेशी सांगड घालत लोकसंग्रहातून संघर्षाला खतपाणी घालण्यासाठी या महोत्सवाची योजना आखण्यात आली. तेव्हापासून सलग १४० वर्षे हा महोत्सव तेवढ्याच जल्लोषात साजरा होत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवाला पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मार्बत जत्रेसह लोकाभिमुख करण्यात येते. तर, दोनशे-अडिचशे वर्षापूर्वी बालकांसाठीही पोळा भरावा म्हणून राजे भोसले यांनी तान्हा पोळा ही संकल्पना सादर केली आणि तेव्हापासून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तान्हा पोळा भरतो. यात चिमुकले आपले लाकडी नंदीबैल घेऊन एकत्र येतात आणि पोळा फुटल्यावर घरोघरी जाऊन शेतकऱ्यांप्रमाणे आपला बोजारा मागत असतात. कृषी संस्कृतीविषयी आत्मियता आणि प्रेम अबाधित राहावे, हा यामागचा हेतू.शनिवारी सकाळी पिवळी व काळी मारबत आपापल्या ठिकाणाहून निघतील. इतवारीत एकत्र येऊन तेथून या महोत्सवाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते आणि हजारो लोकांच्या एकत्रिकरणातून ‘इडा पिडा टळो, माशि मोंगसे घेऊन जा गे मारबत’ असा जल्लोष केला जातो. या दोन प्रमुख मारबतींसोबतच अन्य आठ मारबती या महोत्सवात सहभागी असतील. मारबत महोत्सवामध्येच देश आणि जगपातळीवर असणाऱ्या प्रमुख समस्यांना प्रतिकात्मक पद्धतीने घेऊन बडगेही सादर होत असतात. यंदा या महोत्सवात २१ बडगे सहभागी होणार असून, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, काश्मीर प्रकरणातील कलम ३७०, महागाई, राष्ट्रीय स्तरावरील राजनेते आणि अन्य प्रश्नांवर हे बडगे सांकेतिकरीत्या भाष्य करतील. त्यानंतर, संध्याकाळच्या सुमारास तान्हा पोळा शहरात सर्वत्र भरेल. महाल येथील भोसले पॅलेसमधील मानाचा पोळा फुटल्यानंतर, राजमहालात असलेल्या अतिभव्य अशा लाकडी नंदीबैलाची मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतरच, शहरातील विविध वस्त्यांमध्ये भरविण्यात येणाऱ्या नंदी बैलांचा पोळा फुटेल.मारबत मिरवणुकीचा मार्गमारबत चौक येथून नवसाची पिवळी मारबत, नेहरू पुतळा येथून काळी मारबत पुढे या दोन्ही मारबती एकत्र येऊन ही यात्रा मारवाडी चौक, अमरदीप सिनेमा, शहीद चौक, गांधी पुतळा, बडकस चौक, केळीबाग मार्ग, कोतवाली, गांधीद्वार, अग्रसेन चौक, गांजाखेत चौक, गोळीबार चौक, भारत माता चौक या मार्गाने मिरवणूक निघेल. त्यानंतर नाईक तलावात विसर्जन करण्यात येईल.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर