आयकॅडियन श्रीनाभ अग्रवाल प्रधानमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST2021-02-05T04:50:29+5:302021-02-05T04:50:29+5:30
नागपूर : आयकॅडिन श्रीनाभ अग्रवाल या विद्यार्थ्याला इनोव्हेशन वर्गवारीत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२१ देण्यात आला आहे. हा पुरस्कार नागपूर ...

आयकॅडियन श्रीनाभ अग्रवाल प्रधानमंत्री
नागपूर : आयकॅडिन श्रीनाभ अग्रवाल या विद्यार्थ्याला इनोव्हेशन वर्गवारीत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२१ देण्यात आला आहे. हा पुरस्कार नागपूर शहरासाठी अभिमानाची बाब आहे. आयकॅडचे संचालक सारंग उपगन्लावार म्हणाले, श्रीनाथ आठव्या इयत्तापासूनच फाऊंडेशन कोर्समध्ये आयकॅडमध्ये शिकत आहे. पहिल्याच दिवशीपासून त्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेबद्दल खात्री आहे. दहावीत तो आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत भारताच्या अव्वल तीन विद्यार्थ्यांमध्ये होता. आयकॅडमध्ये आम्हाला खात्री होती की, हा मुलगा विशेष करेल आणि शहर व देशाचा गौरव वाढवेल. गेल्या वर्षी ‘आंतरराष्ट्रीय यूथ मॅथ्स चॅलेंज’ स्पर्धेत प्रथम पारितोषिक जिंकून त्याने नागपूर आणि देशाचा गौरव वाढविला होता. ही स्पर्धा जगभरातील विद्यार्थ्यांसाठी गणिताची सर्वात मोठी आणि कठीण समजली जाते. श्रीनाभ हा मौजेश आणि टीनू अग्रवाल यांचा मुलगा आहे. ट्रिपल लॉक बोर होल प्रोटेक्शन लिड, असंख्य नवकल्पना, दोन पुस्तके, पाच शोधनिबंध आणि १८० लेख यासाठी प्रकाशित पेटंटसाठी हा मुलगा कौतुकास्पद आहे. त्याने २०२० मध्ये केव्हीपीवाय फेलोशिप एसए स्ट्रींगमध्ये जिंकली आहे. (वा.प्र.)