आयबीपीएसने निवडले, बँकेने नाकारले

By Admin | Updated: August 9, 2014 02:33 IST2014-08-09T02:33:39+5:302014-08-09T02:33:39+5:30

देशातील २० राष्ट्रीयकृत व शेड्युल बँकांत विविध पदांसाठी आयबीपीएसच्या (इन्स्टिट्यूट आॅफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाते.

IBPS selected, rejected by the bank | आयबीपीएसने निवडले, बँकेने नाकारले

आयबीपीएसने निवडले, बँकेने नाकारले

नागपूर : देशातील २० राष्ट्रीयकृत व शेड्युल बँकांत विविध पदांसाठी आयबीपीएसच्या (इन्स्टिट्यूट आॅफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाते. आयबीपीएसने निवडलेल्या एका उमेदवारास पंजाब अँड सिंध बँकेने नियुक्त करण्यास चक्क नकार दिला आहे. कृषी अधिकारी (अ‍ॅग्रिकल्चर आॅफिसर) या पदासाठी सचिन शेषराव नारनवरे याने आयबीपीएसची परीक्षा दिली होती.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या वसुधाताई देशमुख कॉलेज आॅफ फूड टेक्नॉलॉजी येथून २०१० साली ‘बी.टेक’ची (फुड सायन्स) पदवी मिळविली. यानंतर आयबीपीएसची तयारी सुरू केली. दरम्यान २०१३ साली देशातील २० बँकात नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली. यात बँकेत अ‍ॅग्रिकल्चर आॅफिसर या पदासाठी देखील अर्ज मागविण्यात आले. होते. अर्ज भरल्यावर ८ फेब्रुवारीला लेखी परीक्षा झाली. यानंतर १८ मार्च रोजी सचिनची मुलाखत घेण्यात आली. १ एप्रिलला या दोन्ही परीक्षेचा निकाल जाहीर करून त्याला पंजाब अँड सिंध बँक येथे अ‍ॅग्रिकल्चर आॅफिसर म्हणून रुजू होण्यास सांगितले. मात्र बँकेत रुजू होण्यासाठी गेल्यावर सचिनला बँकेने तुम्ही जाहिरातीत दिलेल्या निकषात बसत नसल्याचे सांगून नियुक्ती करता येत नसल्याचे सांगितले.
जाहिरातीत दिलेल्या पदव्यांच्या यादीत सचिनने धारण केलेल्या पदवीचा उल्लेख नसल्याचे बँकेने सांगितले आहे. याबाबत सचिनने आयबीपीएसच्या माध्यमातून निवड झालेले व समान पदवी धारण केलेले अनेक अधिकारी अन्य बँकांत नोकरी करीत असल्याचे सांगितले. याबाबत सचिनने आयबीपीएसशी पत्रव्यवहार केला. मात्र आयबीपीएस ही केवळ निवड करणारी संस्था असून नोकरी देण्याचे काम बँकेचे असल्याचे सांगून हात झटकले. यामुळे सचिन नारनवरे याने नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पदभरतीवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: IBPS selected, rejected by the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.