शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आयबीचे अधिकारी अशोक भिंगारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:39 IST

केंद्रीय गुप्तवार्ता विभाग (इंटेलिजन्स ब्यूरो) नागपूर मध्ये कार्यरत असलेले अशोक भिंगारे (वय अंदाजे ५७) यांचे शनिवारी सायंकाळी एका खासगी इस्पितळात निधन झाले. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या सीपीडब्ल्यूडी कॉलनी, सेमिनरी हिल्समधील निवासस्थानाहून निघणार आहे.

ठळक मुद्देनक्षलग्रस्त भागात होते जोरदार नेटवर्क

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय गुप्तवार्ता विभाग (इंटेलिजन्स ब्यूरो) नागपूर मध्ये कार्यरत असलेले अशोक भिंगारे (वय अंदाजे ५७) यांचे शनिवारी सायंकाळी एका खासगी इस्पितळात निधन झाले. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या सीपीडब्ल्यूडी कॉलनी, सेमिनरी हिल्समधील निवासस्थानाहून निघणार आहे.अत्यंत हुशार अधिकारी म्हणून ओळखले जाणाऱ्या भिंगारे यांचा बराचसा सेवाकाळ नागपुरात गेला आहे. त्यांचे विदर्भातील नक्षलग्रस्त भागात जोरदार नेटवर्क होते. या भागातील नक्षलसंबंधी घडामोडींवर त्यांचे विशेष लक्ष असायचे. त्यांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण सूचनावजा माहितीमुळे विदर्भातील गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातील नक्षल कारवायांवर अंकुश ठेवणे सुरक्षा यंत्रणांना सोपे झाले. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल सरकारने त्यांना विविध पदके देऊन अनेकदा गौरव केला. काही महिन्यांपूर्वी भिंगारे यांना कर्करोग झाला होता. त्याच्याशी लढत असतानाच १ मे रोजी त्यांना ब्रेनस्ट्रोकमुळे एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथून त्यांची प्रकृती खालावतच गेली. शनिवारी सायंकाळी ६.२४ वाजता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर