‘आय लव्ह माय इंडिया’१४ ला
By Admin | Updated: August 12, 2014 01:08 IST2014-08-12T01:08:45+5:302014-08-12T01:08:45+5:30
लोकमत युवा नेक्स्ट, सखी मंच, जयहिंद फाऊंडेशन यांच्यावतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘आय लव्ह माय इंडिया’ या देशभक्तीपर गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘आय लव्ह माय इंडिया’१४ ला
देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम
नागपूर : लोकमत युवा नेक्स्ट, सखी मंच, जयहिंद फाऊंडेशन यांच्यावतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘आय लव्ह माय इंडिया’ या देशभक्तीपर गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ आॅगस्ट रोजी, रात्री ८ वाजता सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे लोढा थेरमॅक्स टीएमटी व आयएनआयएफडी हे सहयप्रायोजक आहेत.
प्रसिद्ध गायक एम.ए.कादर, जीनत कादर आणि सारेगामाफेम रिना चंद्रा यांच्या सुमधूर गीतांनी हा कार्यक्रम रंगणार आहे. जयहिंद फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल कोटेचा यांनी सांगितले, दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
देशाप्रति युवकांमध्ये समर्पित भावना निर्माण व्हावी, प्रेरणा मिळावी आणि राष्ट्रभक्तीचे चैतन्य निर्माण व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात येतो. यावेळी नृत्य आणि एकपात्री अभिनयही सादर करण्यात येईल. कार्यक्रमाला टीबीझेड, आर्या, वेदा, आॅरेंज अॅण्ड कॉटन, महावीर मेवावाला, मिनहाज एंटरटेनमेंट यांनी सहकार्य केले आहे.
या कार्यक्रमाचे आकर्षण रिनी चंद्रा ही सारेगामाफेम गायिका असून गीत, संगीत आणि नृत्याचा देशभक्तीपूर्ण मनोरंजक खजिना या निमित्ताने दर्शकांना मिळणार आहे. कार्यक्रमाच्या मोजक्याच प्रवेशिका असून सखी मंच व युवा नेक्स्टच्या सदस्यांना सकाळी ११ वाजतापासून वितरित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी २४२९३५३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुदत्ता रामटेके, रिंकु जैन, श्रीकांत ढोलके, आशिष पांडे, लोकेश बरडिया, रितेश सोनी, आशिष दीक्षित, महेश कुकडेजा, कुमार डागा, अश्विन झवेरी, मनीष धडीवाल, निखिल वैभव, युगल विधावत व ऋषी कोचर सहकार्य करीत आहेत.(प्रतिनिधी)