चक्रासनात भराभर चढला १०२ पायऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:09 IST2020-12-06T04:09:11+5:302020-12-06T04:09:11+5:30
नागपूर : शहरातील राघव साहिल भांगडे या सहा वर्षाच्या चिमुकल्याने अतिशय अवघड अशा चक्रासनात एक-दोन किंवा १०-२० नव्हे तर ...

चक्रासनात भराभर चढला १०२ पायऱ्या
नागपूर : शहरातील राघव साहिल भांगडे या सहा वर्षाच्या चिमुकल्याने अतिशय अवघड अशा चक्रासनात एक-दोन किंवा १०-२० नव्हे तर तब्बल १०२ पायऱ्या चढण्याचा पराक्रम केला आहे.
राघव हा सिव्हिल लाईन्स येथील भवन्समधील पहिल्या वर्गाचा विद्यार्थी आहे. शनिवारी ५ डिसेंबर रोजी त्याचे कराटे व योग शिक्षक विजय गिजारे यांच्या मार्गदर्शनात राहत असलेल्या बाजीप्रभूनगर येथील पुष्पविला अपार्टमेंटच्या १०२ पायऱ्या राघवने चक्रासनात १ मिनिट ५१ सेकंदात पार केल्या. याचा व्हीडीओ मुंबई येथील गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे पाठविण्यात येणार आहे.
* गेल्या वर्षी फोडल्या होत्या १२५ टाईल्स
गेल्या वर्षी राघवने एका मिनिटात १२५ टाईल्स फोडण्याचा विक्रम स्वत:च्या नावे नोंदवला होता. त्यापूर्वी कराटेमध्ये भूतान येथे पार पडलेल्या खेळ महोत्सवात राघवने एक सुवर्ण व एक कांस्यपदक पटकावले होते.
...................
* टाळेबंदीत प्रॅक्टीस बंदच होती. म्हणून पालकांच्या विनंतीवरून त्याला कराटे आणि योगक्रियांचे प्रकार शिकवित असताना चक्रासनात त्याने पायऱ्या चढल्या. त्यानंतर त्याला प्रोत्साहन दिले. हा एकमेव विक्रम असणार आहे. गिनिज बुकची सर्व प्रक्रिया आता पार पाडणार आहोत.
- विजय गिजारे (प्रशिक्षक)
...........