नागपूर : विद्यापीठात माेठे राजकारण हाेते, विशिष्ठ ग्रुपची सरशी आहे, असे मी ऐकून हाेते. मात्र मला त्याचे काही करायचे नाही. कुठल्याही राजकारणाला मी घाबरत नाही किंवा त्याचा प्रभावही माझ्यावर पडत नाही. माझ्यासाठी विद्यापीठाचे व विद्यार्थ्यांचे हित सर्वाेपरी आहे, अशी राेखठाेक भूमिका राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. मनाली क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
श्री शिवाजी शिक्षण संस्था, शिव परिवार आणि विद्यापीठाच्या प्राचार्य फाेरमच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्त झालेल्या डाॅ. मनाली क्षीरसागर यांचा भव्य सत्कार समारंभ आयाेजित करण्यात आला. याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. भैयासाहेब पुसदेकर, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. आर. जी. भाेयर, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्रा. सुभाष बनसाेड, प्राचार्य फाेरमचे अध्यक्ष दिलीप गाेतमारे, सचिव आर. जी. टाले, शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. ओमराज देशमुख, धनवटे काॅलेजचे प्राचार्य डाॅ. प्रशांत काेठे, पवनीच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश अने प्रामुख्याने उपस्थित हाेते.
सत्काराला उत्तर देताना कुलगुरू म्हणाल्या, टेबलच्या त्या बाजुला असताना विद्यापीठाच्या ‘चालते आहे’ धाेरणाचा त्रास मलाही झाला. आता मी या बाजुला आहे. ज्या गाेष्टीसाठी मी तयार नसते, ते पद मी स्वीकारत नाही. ३३ वर्षाच्या शैक्षणिक सेवेदरम्यान सामाजिक व काैटुंबिकही जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर या माेठ्या पदासाठी मी तयार असल्याची जाणीव झाली व कुलगुरू पद स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकारण, ‘ग्रुप डायनॅमिक्स’, दबाव या गाेष्टी समजण्याची क्षमता निर्माण झाल्यानंतरच पद स्वीकारण्यास सज्ज झाल्याचे त्या म्हणाल्या. वास्तविक काय व एजेंडा काय, हे समजण्यास खंबीर असल्याने ५० टक्के लाेक आणि संघटना दाराबाहेर असतात. दाराच्या आत येणाऱ्यांना मी हाताळू शकते, अशी राेखठाेक प्रतिक्रिया त्यांनी दिली. पहिली महिला कुलगुरू म्हणून माझे नाव साेडून आणि सार्थ ठरवून जाईल, अशी भावनाही डाॅ. क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
तत्पूर्वी प्रा. आर. जी. भाेयर यांनी चांगलीच फटकेबाजी केली. कुलगुरू आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यात सुसंवाद आवश्यक आहे, तेव्हाच युजीसी, राज्य किंवा केंद्र सरकारची ध्येयधाेरणे, याेजना महाविद्यालयात यशस्वीपणे राबविता येतात व त्याचा लाभ शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पाेहचताे. मात्र गेल्या काही वर्षात विद्यापीठाचे कुलगुरू व अधिकाऱ्यांचे काम समाधानकारक नसल्याची टीका प्रा. भाेयर यांनी केली. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धाेरण (एनईपी २०२०) राबविण्यात माेठा गाेंधळ झाल्याचे ते म्हणाले. सर्वत्र अनागाेंदी कारभार आहे. ५० टक्के अधिष्ठाता, २५ टक्के प्राचार्य व १२ टक्के प्राध्यापकांना एनईपीची नियमावली माहिती नाही. अनेकांना विद्यापीठाचे कायदे माहिती नाहीत. अशांना प्र-कुलगुरू किंवा अधिष्ठाता पदावर नियुक्त करू नका, असे आवाहनही त्यांनी कुलगुरुंना केले. प्रास्ताविक हेमंत काळमेघ व संचालन प्रा. किर्ती काळमेघ यांनी केले.
मी लांगुलचालन करायला आले नाही - कुलगुरू
अधिष्ठाता नियुक्तीच्या आवाहनावर कुलगुरू डाॅ. क्षीरसागर यांनीही राेखठाेक उत्तर दिले. मी ईथे कुणाचे लांगुलचालन करायला किंवा भावना सांभाळायला आले नाही. ताे माझा स्वभाव नाही. चुक असूनही जे आतापर्यंत चालत आले, ते मी बराेबर मानणार नाही. कुणाला चांगले वाटेल म्हणून किंवा कुणाचा दबाव आहे म्हणून, काेणतीही गाेष्ट मी करणार नाही. जे विद्यार्थी हिताचे नाही, विद्यापीठासाठी त्याचे काही फलित नाही, अशा गाेष्टींसाठी ५ मिनिटेही वेळ माझ्याकडे नाही, अशी राेखठाेक भूमिका कुलगुरुंनी व्यक्त केली.
Web Summary : VC Dr. Kshirsagar prioritizes student welfare, dismissing university politics. She accepted the position ready to handle pressures, focusing on beneficial actions for students and the university, not succumbing to external influences.
Web Summary : कुलपति डॉ. क्षीरसागर ने छात्र हित को प्राथमिकता दी, विश्वविद्यालय की राजनीति को खारिज किया। उन्होंने दबावों को संभालने के लिए पद स्वीकार किया, छात्रों और विश्वविद्यालय के लिए लाभकारी कार्यों पर ध्यान केंद्रित किया।