स्वच्छता, सौंदर्यीकरण अन् आभासी पंख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:09 IST2021-04-30T04:09:57+5:302021-04-30T04:09:57+5:30
रस्ता एकच असतो. आशा-आकांक्षेनुसार त्याला फाटे फोडावे लागतात किंवा परिस्थितीनुसार फुटलेल्या फाट्यांवर मार्गक्रमण करावे लागते. या छायाचित्रात याच फाट्यांचे ...

स्वच्छता, सौंदर्यीकरण अन् आभासी पंख!
रस्ता एकच असतो. आशा-आकांक्षेनुसार त्याला फाटे फोडावे लागतात किंवा परिस्थितीनुसार फुटलेल्या फाट्यांवर मार्गक्रमण करावे लागते. या छायाचित्रात याच फाट्यांचे विश्लेषण होते. देशात स्वच्छतेचे वारे वाहायला लागले आहे. जिथे कुठे लोक ऐकायला तयार नाहीत, तेथे सौंदर्यीकरण करवून मेंदू तल्लख केला जात आहे. रेशीमबागेजवळील एका भिंतीवर असे सुरेख चित्र साकारण्यात आले. याच चित्रापुढे ही महिला डोक्यावर घरबांधकामातील वीट घेऊन आहे. तिच्या पंखांना बळ हवे आहे. तिची ही भावना छायाचित्रण कौशल्यामुळे जगापुढे उजागर झाली आहे, तर तिथेच एक युवक बापूंच्या चित्रापुढे उभा आहे. कदाचित अंत्योदयाचा हा चेहरा असावा आणि सोबत एक पाऊल स्वच्छतेकडे, असा संदेश आहे. हे सगळे मार्ग एकाच रस्त्यावरून जातात, ते शोधायचे आहेत.
- छायाचित्र : मुकेश कुकडे
....