१६० वर्षे जुन्या दार्जिलिंग वृक्षारोपणातून आले हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:01 IST2020-04-19T00:00:36+5:302020-04-19T00:01:45+5:30
तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, परंतु कोरोना संसर्गावर प्रभावी असल्याचे मानले जाणारे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध हे उत्तर-पश्चिम बंगालमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या दार्जिलिंगजवळील १६० वर्षे जुन्या वृक्षारोपणातून आले आहे.

१६० वर्षे जुन्या दार्जिलिंग वृक्षारोपणातून आले हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, परंतु कोरोना संसर्गावर प्रभावी असल्याचे मानले जाणारे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध हे उत्तर-पश्चिम बंगालमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या दार्जिलिंगजवळील १६० वर्षे जुन्या वृक्षारोपणातून आले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यातच हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या निर्यातीवरील बंदी उठविण्यासाठी भारत सरकारवर दबाव आणल्यानंतर आतापर्यंतची गोपनीय माहिती समोर आली आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन जे मुळात क्विनाईन सल्फेट असून ते सिंचोना वनस्पतीच्या झाडाच्या सालातून काढण्यात आल्याचे दार्जिलिंगजवळील हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन प्रकल्पातील वैज्ञानिकांचे मत आहे. वर्षातून एकदा या पिकाची कापणी केली जात असल्याने सिंचोना सालीचा पुरवठा मर्यादित आहे. म्हणूनच या औषधाच्या निर्यातीवर भारताने बंदी घातली होती, असे या वैज्ञानिकांनी सांगितले.
टंचाईमुळे मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमधील क्विनाईन उत्पादक औषध कंपन्यांकडून सिंचोनाच्या सालीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोविड-१९ साथीच्या आजाराचा प्रसार होण्यापूर्वी सिंचोनाची साल ११० रुपये प्रतिकिलो दराने विकली जायची; मात्र आता किंमत १०० टक्क्यांनी वाढली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सिंचोनाच्या औषधी गुणधर्मांची माहिती असलेल्या ब्रिटिश शासकांनी प्रथम सिंचोना बियाणे १८६१ मध्ये कोलकाता येथील रॉयल बॉटनिकल गार्डनमध्ये पाठविले. त्यावेळी कोलकाता येथे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी १८६४ मध्ये दार्जिलिंगजवळील ६९०० एकर जमिनीवर सिंचोना वृक्षारोपण केले. सिंचोनाचा उगम पेरू येथे आहे, जिथे त्याला किनाकिना वनस्पती म्हणतात. पूर्वी पेरूच्या इंका राज्यकर्त्यांना किनाकिनाच्या औषधी वापराची माहिती होती. त्याला स्पॅनिश भाषेत सीना तर त्याचे अंगीकृत रूप सिंचोना म्हणून ओळखले जाऊ लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.