हुश्श ! अखेर परीक्षा संपल्या ‘जेईई-अॅडव्हान्स’ झाली :
By Admin | Updated: May 25, 2015 02:47 IST2015-05-25T02:47:51+5:302015-05-25T02:47:51+5:30
दोन वर्षंअगोदरच दहावीचा निकाल लागल्यापासूनच अभ्यासाला सुरुवात केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी रविवारी सुटकेचा नि:श्वास टाकला.

हुश्श ! अखेर परीक्षा संपल्या ‘जेईई-अॅडव्हान्स’ झाली :
आता प्रतीक्षा निकालांची
नागपूर : दोन वर्षंअगोदरच दहावीचा निकाल लागल्यापासूनच अभ्यासाला सुरुवात केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी रविवारी सुटकेचा नि:श्वास टाकला. ‘आयआयटी’मध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई-अॅडव्हान्स’ परीक्षा शहरातील विविध केंद्रांवर पार पडली.
‘जेईई-मेन्स’चा निकाल २७ एप्रिल रोजी जाहीर झाला. यात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी ‘जेईई-अॅडव्हान्स’साठी तयारी सुरू केली. पहिले बारावी, नंतर ‘जेईई-मेन्स’ व आता ‘जेईई-अॅडव्हान्स’ या परीक्षांसाठी अभ्यास करण्यातच विद्यार्थी व्यस्त होते. रविवारी सकाळी ९ ते १२ यादरम्यान पेपर १ तर दुपारी २ ते ५ यादरम्यान पेपर २ घेण्यात आला. शहरातील ७०० हून अधिक तर विभागातील ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विद्यार्थ्यांचे ‘जेईई-अॅडव्हान्स’ व बारावीच्या परीक्षेतील गुण यांच्या आधारावर ‘पर्सेंटाईल’ काढण्यात येणार आहेत.
कही खुशी, कही गम
या दोन्ही पेपरमध्ये समाविष्ट तिन्ही विषयांचे अनेक प्रश्न फिरवून विचारण्यात आले होते. ज्या विद्यार्थ्यांनी स्वअभ्यासावर जास्त भर दिला होता, त्यांना प्रश्न कठीण वाटले नाही. परंतु अनेक विद्यार्थी गोंधळात पडल्याचे दिसून आले. बरेचसे प्रश्न हे ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकातील होते. गणिताचा पेपर अनेकांना जड गेला.(प्रतिनिधी)