अस्वलाच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

By Admin | Updated: May 23, 2017 13:06 IST2017-05-23T13:06:07+5:302017-05-23T13:06:07+5:30

भामरागडपासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या मिदनापल्लीच्या जंगलात सोमवारी दुपारी तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका दांपत्यावर अस्वलाने हल्ला चढविला.

Husband's death in beau attack, wife serious | अस्वलाच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

अस्वलाच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली-भामरागडपासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या मिदनापल्लीच्या जंगलात सोमवारी दुपारी तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका दांपत्यावर अस्वलाने हल्ला चढविला. त्यात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे.
मिदनापल्ली येथे राहणारे राजू विजा मज्जी (५५) व सोनी राजू मज्जी (४५) हे दोघे तेंदूपत्ता तोडण्याकरिता जंगलात गेले असता एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात राजूचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सोनी ही गंभीररित्या जखमी झाली. तिला उपचारासाठी नागपूरला आणण्यात आले आहे.

Web Title: Husband's death in beau attack, wife serious