काेंढाळी : हातात सायकल घेऊन पायी जात असलेल्या दाम्पत्यास विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव दुचाकीस्वाराने जाेरात धडक दिली. त्यात गंभीररीत्या दुखापत झालेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चमेली शिवारात साेमवारी (दि. ११) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
नामदेव जंगलू साेनवणे (७५, रा. चमेली, ता. काटाेल) असे मृत पतीचे तर रुख्माबाई नामदेव साेनवणे (७०) असे जखमी पत्नीचे नाव आहे. साेमवारी सायंकाळच्या सुमारास पती-पत्नी दाेघेही हाती सायकल घेऊन शेतातून पायी घराकडे जात हाेते. दरम्यान, अचानक विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमपी-४७/एमएल-८४२९ क्रमांकाच्या भरधाव दुचाकीस्वाराने दाम्पत्यास जबर धडक दिली. त्यात दाेघेही गंभीर जखमी झाले. जखमींना प्रथम काेंढाळी प्राथमिक आराेग्य केंद्र व त्यानंतर नागपूर मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मंगळवारी नामदेव साेनवणे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी छत्रपती उत्तमराव भाेडवे (२७, रा. चमेली, ता. काटाेल) यांच्या तक्रारीवरून काेंढाळी पाेलिसांनी आराेपी दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक देवेंद्र साेनवणे करीत आहेत.