अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:14 IST2021-02-21T04:14:19+5:302021-02-21T04:14:19+5:30

बुटीबाेरी : वेगात असलेली माेटारसायकल गतिराेधकावरून स्लीप झाली. त्यात दुचाकीवरील दांपत्य खाली पडून गंभीर जखमी झाले. यात पतीचा उपचारादरम्यान ...

Husband killed in accident, wife injured | अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी जखमी

अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी जखमी

बुटीबाेरी : वेगात असलेली माेटारसायकल गतिराेधकावरून स्लीप झाली. त्यात दुचाकीवरील दांपत्य खाली पडून गंभीर जखमी झाले. यात पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पत्नीवर उपचार सुरू आहेत. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-वर्धा मार्गावरील आसाेली (सावंगी) (ता. हिंगणा) शिवारात घडली.

मधुकर पंजाबराव शेळके (३६) असे मृत पतीचे नाव असून, शीतल शेळके असे जखमी पत्नीचे नाव आहे. दाेघेही दुकाचीने (क्र. एमएच ३१ एफएम ४५२४) नागपूरहून वर्धेला जात हाेते. आसाेली (सावंगी) शिवारातील गतिराेधकावर त्यांची माेटारसायकल स्लीप झाल्याने दाेघेही खाली काेसळले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने सुरुवातीला बुटीबाेरी येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना सावंगी (मेघे) (जिल्हा वर्धा) येथील आचार्य विनाेबा भावे रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे मधुकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनटक्के करीत आहेत.

Web Title: Husband killed in accident, wife injured