पत्नीच्या विरहात पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:21 IST2021-02-20T04:21:32+5:302021-02-20T04:21:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पत्नीच्या विरहात अस्वस्थ झालेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. प्रमोद किशोरीलाल महतो (वय २६) ...

पत्नीच्या विरहात पतीची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नीच्या विरहात अस्वस्थ झालेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. प्रमोद किशोरीलाल महतो (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हिंगणा मार्गावरील पंचशिल नगरात राहणारा प्रमोद सफाई कर्मचारी होता. त्याच्या पत्नीने महिनाभरापूर्वी घरगुती कारणावरून आत्महत्या केली होती. तेव्हापासून प्रमोद कमालीचा अस्वस्थ राहायचा. त्याच्या घरच्यांनी आणि मित्रमंडळींनी त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र, पत्नीच्या विरहात कासावीस झालेल्या प्रमोदची मानसिक स्थिती सारखी बिघडतच गेली. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी सायंकाळी ५.३०च्या सुमारास प्रमोदने गळफास लावून घेतला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. प्रमोदचा मोठा भाऊ मनोज (वय ३५) याने दिलेल्या माहितीवरून एमआयडीसीचे एएसआय घाटे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----