पती-पत्नीची मुलीसह आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST2021-02-05T04:43:42+5:302021-02-05T04:43:42+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : एकाच कुटुंबातील तिघांनी वैनगंगा नदीतील गाेसेखुर्द प्रकल्पाच्या ‘बॅक वाॅटर’मध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही ...

पती-पत्नीची मुलीसह आत्महत्या
लाेकमत न्यूज नेटवर्क
वेलतूर : एकाच कुटुंबातील तिघांनी वैनगंगा नदीतील गाेसेखुर्द प्रकल्पाच्या ‘बॅक वाॅटर’मध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना वेलतूर (ता. कुही) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील आंभाेरा येथे रविवारी (दि. ३१) दुपारी २ च्या सुमारास उघडकीस आली. मृतांमध्ये पती, पत्नी व मुलीचा समावेश आहे. त्यांनी शनिवारी (दि. ३०) रात्री आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पाेलीस सूत्रांनी व्यक्त केली.
श्याम गजानन नारनवरे (वय ४६), सविता श्याम नारनवरे (३५) व समता श्याम नारनवरे (१२, रा. प्लाॅट नंबर-११०, अनमाेल नगर, हनुमान मंदिराच्या मागे, वाठाेडा, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. गाेसे खुर्द प्रकल्पाचे ‘बॅक वाॅटर’ वैनगंगा नदीच्या पात्रापासून ५०० मीटर अंतरावर आहे. याच ‘बॅक वाॅटर’लगत आंभाेरा- नागपूर मार्ग गेला असून, या ठिकाणी राेड उंच आहे. नावाडी या ‘बॅक वाॅटर’मध्ये मासेमारी करीत आसताना त्यांना तीन मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यामुळे त्यांनी लगेच पाेलिसांना सूचना दिली.
पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून नावाड्यांच्या मदतीने तिन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले व उत्तरीय तपासणीसाठी कुही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. श्याम यांच्या खिशातील कागदपत्रांवरून पाेलिसांनी त्यांची बहीण ज्याेती संजय घरत (३२, रा. वाठाेडा, नागपूर) यांना कळविले. त्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतांची ओळख पटली. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी ज्याेती घरत यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद केली आहे. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक किशाेरकुमार वैरागडे करीत आहेत.
...
ओढणीने बांधले हात
पाण्यात उडी घेऊन मृत्यू झाल्यानंतर मृतदेह १२ ते १४ तासांनी पाण्यावर तरंगायला सुरुवात हाेते. त्यामुळे या तिघांनीही शनिवारी रात्री ९ ते १० च्या सुमारास पाण्यात उडी घेतली असावी, अशी शक्यता ठाणेदार आनंद कविराज यांनी व्यक्त केली. सविता व समता यांचे हात ओढणीने, तर श्याम व सविता यांचे हात दुपट्ट्याने बांधले हाेते. उडी घेतल्यानंतर हाताला बांधलेला दुपट्टा सुटल्याने श्यामचा मृतदेह सविता व समताच्या मृतदेहापासून पाच फूट अंतरावर आढळून आला. तिन्ही मृतदेह राेडलगतच्या पाण्यात आढळून आले असून, राेडलगत त्यांची माेटरसायकलही हाेती. त्यामुळे तिघेही शनिवारी रात्री माेटरसायकलने नागपूरहून आंभाेरा येथे आले असावेत, अशी शक्यता आनंद कविराज यांनी व्यक्त केली.