उत्तर वनपरिक्षेत्रात शिकाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:09 IST2021-03-31T04:09:07+5:302021-03-31T04:09:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रील कच्छीमेट ते फुकेश्वर डांबरीकरण मार्गावर वनविभागाची चमू गस्तीवर असताना संशयित वाहनाच्या ...

Hunters arrested in North Forest Reserve | उत्तर वनपरिक्षेत्रात शिकाऱ्यांना अटक

उत्तर वनपरिक्षेत्रात शिकाऱ्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रील कच्छीमेट ते फुकेश्वर डांबरीकरण मार्गावर वनविभागाची चमू गस्तीवर असताना संशयित वाहनाच्या तपासणीदरम्यान शिकाऱ्यांना अटक करण्यात आली. होळीच्या पार्श्वभूमीवर २८ मार्च रोजी रात्री १०.५० वाजताच्या सुमारास उपवनक्षेत्र मटकाझरी, नियतक्षेत्र वडद येथील कक्ष क्रमांक ३१७ पीएफ येथे ही कारवाई केल्या गेली. मुकेश अशोक नागपुरे, धनराज नथ्थूजी दुधपचारे आणि सुनील यशवंत मसराम (रा. पाचगाव, ता. उमरेड) अशी अटक करण्यात आलेल्या शिकाऱ्यांची नावे आहेत.

आरोपींनी वापरलेल्या चारचाकी वाहनाची (क्रमांक एमएच-४०/केआर-८१९३) तपासणी केली असता यामध्ये भरमार बंदूक, बंदुकीचे छर्रे, बारुद, टॉर्च, बझर मशीन, एलईडी लाईट, पेंचीस, पेचकस, कैची आदी साहित्य आढळून आले. चौकशीदरम्यान आरोपी जंगलात शिकारीकरिता गेले असल्याची कबुली वनविभागास दिली. हे संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आले. कुही येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय येथे आरोपींना हजर करण्यात आले असता, त्यांची जामिनावर सुटका झाली. नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, सहायक वनसंरक्षक एन. जी. चांदेवार, उत्तर उमरेडचे वनपरिक्षेत्राधिकारी ए. के. मडावी यांच्या मार्गदर्शनात एस. पी. काळे, व्ही. डी. शेंडे, एन. जी. सोनटक्के, बी. जी. साखरे, आर. डी. सुधेकर, एम. डी. कोरे, जी. एस. सहारे, जी. व्ही. दहीकर, भीमराव लोणारे, ज्ञानेश्वर मानकर, वासुदेव ठाकरे आदींनी ही कामगिरी पार पाडली.

....

शिकाऱ्यांवर नजर

उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान साधत शिकाऱ्यांना अटक केल्यानंतर आता अन्य ठिकाणीसुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्य काही अंतरावरच आहे. शिवाय अन्य परिसरातही जंगलक्षेत्राचा बहुतांश भाग उमरेड परिसरात येत असून, शिकाऱ्यांच्या टोळीवर, त्यांच्या बारीकसारीक हालचालींवर वनविभागाने बारकाईने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी वन्यप्रेमी करीत आहेत.

Web Title: Hunters arrested in North Forest Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.