भूखंड घेणार्‍या शेकडो जणांची फसवणूक

By Admin | Updated: May 22, 2014 02:11 IST2014-05-22T02:11:34+5:302014-05-22T02:11:34+5:30

सुलभ हप्त्याने भूखंड देण्याचे आमिष दाखवून शेकडो जणांना कोट्यवधींचा गंडा घालणारा सुरेश बुरेवार फरार आहे.

Hundreds of people who took the plot were cheated | भूखंड घेणार्‍या शेकडो जणांची फसवणूक

भूखंड घेणार्‍या शेकडो जणांची फसवणूक

नागपूर : सुलभ हप्त्याने भूखंड देण्याचे आमिष दाखवून शेकडो जणांना कोट्यवधींचा गंडा घालणारा सुरेश बुरेवार फरार आहे. पोलीस त्याचा जागोजागी शोध घेत आहेत. दरम्यान, पवनसूत आणि गृहलक्ष्मी डेव्हलपर्सच्या कार्यालय आणि बुरेवारच्या निवासस्थानाहून गुन्हेशाखेच्या पोलिसांनी मंगळवारी मोठय़ा प्रमाणावर कागदपत्रे जप्त केली. त्याची छाननी करून फसवणुकीचे पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.

छत्रपती चौकातील पवनसूत रियल इस्टेट अँण्ड डेव्हलपर्सचा मालक संतोष कोंडबाजी बुरेवार आणि त्याचा भाऊ सुरेश कोंडबाजी बुरेवार (रा. मनीषनगर) या दोघांनी खोब्रागडे नामक शेतकर्‍याच्या पत्नीसोबत मौजा खापरी डव्वा येथील शेतजमिनीचा सौदा केला.

या जागेची विक्री न करताच आरोपींनी तेथे अनधिकृत लेआऊट टाकून अनेकांना भूखंड विकले. २00५ पासून भूखंडाच्या नावाखाली रक्कम उकळणार्‍या बुरेवार बंधूंनी तब्बल ६ वर्षे होऊनही शेकडो जणांना विक्री करून दिली नाही. दरम्यान, गेल्या वर्षी संतोष बुरेवारचा मृत्यू झाला. त्यानंतर शेकडो भूखंडधारक छत्रपती चौकातील कार्यालयावर धडकले. यावेळी सुरेश बुरेवार आणि त्याच्या नातेवाईकांनी सर्वांना भूखंडाची विक्री करून मिळेल, असे सांगून त्यांची समजूत काढली. प्रत्यक्षात ही जमीनच त्यांची नसल्याने भूखंड विक्रीचा प्रश्नच नव्हता. विजेंद्र अशोक गोजे (वय ३९, रा. कोठी महाल) यांनी सदर जमिनीचा सातबारा काढल्यानंतर ही फसवणूक उघडकीस आली. त्यामुळे गोजेंनी गुन्हेशाखेत तक्रार नोंदवली. त्यांच्या पाठोपाठ अनेकांनी गुन्हेशाखेत तक्रारी नोंदवल्या. या पार्श्‍वभूमीवर, गुन्हेशाखेचे विष्णूकांत भोये, पोलीस निरीक्षक नरेश पवार, माणिक नलवडे, संभाजी मुरकुटे, हवालदार चक्रधर राऊत,अनिल पाटील, महेंद्र सरोदे आणि कनिका पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी बुरेवारच्या कार्यालय आणि निवासस्थानी छापे घातले. येथे पोलिसांनी कोट्यवधींच्या स्थावर मालमत्तेची आणि व्यवहाराची कागदपत्रे, बँक पासबुक, चेकबुक, शेतकरी, ग्राहक, आणि दलालांची यादी जप्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of people who took the plot were cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.