लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पेंच-४ जलशुद्धिकरण केंद्रात बसविण्यात आलेल्या ३३ केव्ही इनकमिंग एचटी केबलमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे रविवारी सकाळी सात वाजल्यापासून महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाला. संबंधित अडचणी दूर करण्यात विद्युत विभागाचे कर्मचारी व्यस्त राहिले.
सुमारे १३ तासांच्या प्रयत्नांनंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला. मात्र, त्यामुळे रविवारी दिवसभर १६ पाण्याच्या टाक्यांना जोडलेल्या शेकडो वसाहतींना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सातच्या सुमारास जलशुद्धिकरण केंद्र सुरू झाले. मात्र, येथून शहरापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी अनेक तास लागले. टँकरनेही पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
प्रभावित वस्त्या
- नारा पाण्याची टाकी : निर्मल सोसायटी, आराधना कॉलनी, शंभू नगर, शिवगिरी लेआउट, नुरी कॉलनी, तवक्कल सोसायटी, आर्य नगर, ओम नगर, नारा गाव, वेलकम सोसायटी, देवी नगर, प्रीती सोसायटी.
- नारी-जरिपटका पाण्याची टाकी : भीम चौक, हुडको कॉलनी, नागार्जुन कॉलनी, कस्तुरबा नगर, कुकरेजा नगर, मार्टिन नगर, विश्वास नगर, खुशी नगर, एलआयजी कॉलनी, एमआयजी कॉलनी, सुगत नगर, कबीर नगर, कपिल नगर, कामगार नगर, रमाई नगर, दीक्षित नगर, सन्याल नगर, चैतन्य नगर, सहयोग नगर, मानव नगर, शेंडे नगर, राजगृह नगर, लहानूजी नगर.
- लक्ष्मीनगर नवीन पाण्याची टाकी : सुरेंद्र नगर, देव नगर, सावरकर नगर, विवेकानंद नगर, विकास नगर, हिंदुस्थान कॉलनी, प्रगती नगर, गजानन नगर, सहकार नगर, समर्थ नगर (पूर्व आणि पश्चिम), प्रशांत नगर, अजयनी कॉम्प्लेक्स, उर्विला कॉलनी, राहुल नगर, नवजीवन कॉलनी, छत्रपती नगर, कानफाडे नगर, विश्राम नगर, संताजी नगर, एलआईसी कॉलोनी, रामकृष्ण नगर, आदींसह धंतोली पाण्याची टाकी, ओंकारनगर, श्री नगर, नालंदानगर, सक्करदरा पाण्याच्या टाकीशी जुळलेल्या वस्त्यांना रविवारी पाणी पुरवठा होऊ शकला नाही.