एकतर्फी प्रेमातून युवतीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:07 IST2021-05-12T04:07:32+5:302021-05-12T04:07:32+5:30
नागपूर : एकतर्फी प्रेमातून एका युवतीचा पाठलाग करून आरोपीने तिचा विनयभंग केला. आसिफ खान (वय १८) असे आरोपीचे नाव ...

एकतर्फी प्रेमातून युवतीचा विनयभंग
नागपूर : एकतर्फी प्रेमातून एका युवतीचा पाठलाग करून आरोपीने तिचा विनयभंग केला. आसिफ खान (वय १८) असे आरोपीचे नाव असून, तो आसिनगर टेका नाका भागात राहतो.
पीडित युवती (वय १७) वर आरोपी आसिफ खान एकतर्फी प्रेम करतो. तिने मनाई करूनही तो तिचा नेहमी पाठलाग करतो. अलीकडे तो निर्ढावल्यासारखा वागतो. तिची छेड काढण्याचा प्रयत्न करतो. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ती शिकवणी वर्गाला जात असताना त्याने तिचा पाठलाग केला. तिने विरोध केला असता त्याने तिच्याशी अश्लील वर्तन केले. तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. युवतीने ही माहिती आपल्या घरच्यांना दिली. २ ऑगस्ट २०२० पासून तो त्रास देत असल्याचेही सांगितले. त्यामुळे युवतीच्या पालकांनी तिला सरळ तहसील पोलीस ठाण्यात नेले. तेथे आरोपी आसिफ खानविरुद्ध युवतीने तक्रार नोंदवली. पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी सुरू आहे.
---