Coronavirus in Nagpur; माणुसकीचा परिचय, हीच नागपूरकरांची खासियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 12:05 PM2020-03-26T12:05:52+5:302020-03-26T12:06:22+5:30

कर्फ्यूजन्य परिस्थिती असतानाही शहरातील काही सहृदयी लोक त्यांच्यामदतीसाठी पुढे येत आहे. अशा संकटाच्या काळात माणुसकीचा परिचय दिला जातो. हीच भारतीयांची खासियत आहे.

Humanity is the specialty of Nagpur | Coronavirus in Nagpur; माणुसकीचा परिचय, हीच नागपूरकरांची खासियत

Coronavirus in Nagpur; माणुसकीचा परिचय, हीच नागपूरकरांची खासियत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माणसाची खरी ओळख ही संकटाच्या काळातच होते. सध्या कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र व राज्यातील सरकार यांच्यासोबत प्रशासन, पोलीस व आरोग्य विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. नागपूरमध्ये संक्रमण वाढू नये म्हणून सरकारने सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या अवागमनावर निर्बंध लावले आहे. सुरुवातीला लॉकडाऊन केले आणि सोमवारी रात्रीपासून कर्फ्यू लावला. त्यामुळे सर्वकाही बंद असल्याचा परिणाम जे लोक हातावर आणतात आणि पानावर खातात त्यांच्यावर पडला आहे. त्यांना घरातच थांबावे लागल्याने त्याच्यापुढे पोटापाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. कर्फ्यूजन्य परिस्थिती असतानाही शहरातील काही सहृदयी लोक त्यांच्यामदतीसाठी पुढे येत आहे. अशा संकटाच्या काळात माणुसकीचा परिचय दिला जातो. हीच भारतीयांची खासियत आहे.

- बंदोबस्तात तैनात पोलिसांना दिला आधार

शहरातील लॉकडाऊन व कर्फ्यूमुळे पोलीस रस्त्यावरील चौकाचौकात तैनात आहे. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीसांनाही नाकाबंदीमध्येही तैनात करण्यात आले आहे. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची संधीही मिळालेली नाही. पोलिसांना आधार देण्यासाठी सुभेदार ले-आऊट येथील अबोली शेलोटे सामोर आल्या. अबोली यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना खाण्याचे पॅकेट्स दिले. अबोलीचे म्हणणे आहे की, या संकटापासून बचाव करण्यासाठी अत्यावश्यक सेवेत पोलिसांची सेवा अतिशय महत्त्वाची आहे. पोलीस कर्मचारी सातत्याने ड्युटी करीत आहे. जे लोक घरात आहे, त्यांच्यासाठी व जे रस्त्यावर कार्यरत आहे, त्यांच्यासाठीही पोलीस सेवा देत आहे. पोलिसांना संशयितांना क्वारंटाईन सेंटरपर्यंत पोहचविण्याचे कामसुद्धा करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अबोली यांनी खाद्य पदार्थ तयार करून पोलीस कर्मचाºयांना वाटप केले.

- कचरा उचलणाऱ्यांसाठी मदतीचा हात

शहरात कचरा उचलणाºया बरोबरच येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीई अ‍ॅक्शन कमिटी व आय डू फर्स्ट फाऊंडेशनचे चेअरमन शाहीद शरीफ यांनी हात दिला आहे. त्यांनी या लोकांना जेवण, बिस्कीट व पाण्याची बाटली उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या कार्यात बेझनबाग महिला मंडळ सुद्धा हातभार लावत आहे. शरीफ यांचे म्हणणे आहे की संकटाच्या काळात सर्वांनी एक दुसऱ्याच्या मदतीसाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. सोबतच त्यांनी जनतेला आवाहन केले की आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका.

- फूटपाथवरील लोकांसाठी अन्नदान
कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गरिबांच्या कुटुंबीयांना, आवश्यक असलेले साहित्य पोहचविण्यासाठी काही लोक पुढे येत आहे. प्रशासनाच्या परवानगीने काही लोक निस्वार्थ भावनेने सेवा देत आहे. स्व. विश्वनाथ राय बहुद्देशीय संस्था शब्दसुगंधद्वारे गरजवंतांसाठी भोजनदानाची व्यवस्था करत आहे. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. वसुंधरा राय यांनी फूटपाथवर राहणाºया लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. त्या फूटपाथवर राहणाºया मुलांना शिकवितात. कोरोनामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्यांना जेवण बनविण्यासाठी अन्नदान केले.

- गरजवंतांना सॅनिटायझर, साबणाचे वितरण
नौजवान संदल कमिटीच्या सदस्यांनी प्रशासनाच्या परवानगीने गरजवंतांना सॅनिटायझर, हॅण्डवॉश व साबणाचे वितरण केले. यावेळी कमिटीचे अध्यक्ष अब्दुल लतीफ खान, हाजी गनी खान, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष वसीम खान उपस्थित होते.

- पोलीस कर्मचाऱ्यांना दिले मास्क
कोरोनाच्या संक्रमणापासून पोलिसांचा बचाव करण्यासाठी, त्यांचे आरोग्य सृदृढ रहावे म्हणून मुस्लिम अन्सारी समाजाचे हाजी अतीकुर्रहमान अन्सारी, जमील अन्सारी, हबीब अन्सारी यांनी पोलिसांना मास्कचे वितरण केले.

- रस्त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांना मदत 
रस्त्यावर राहणारे, पुलाखाली झोपणाऱ्यांची भूक शमविण्यासाठी सेवा किचन, इंडियन सेंटर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटतर्फे जीवनावश्यक वस्तू व खाद्य सामुग्रीचे वाटप करण्यात आले. यात मुश्ताक पठाण , फादर हेरॉल्ड , शशांक पाटील , वैभव घरडे, ललित वाघ यांचे सहकार्य लाभले.


- नागपूर फुडीजचे कौतुक
फेसबुकवर काही वर्षापासून ‘नागपूर फुडीज’ नावाने एक ग्रुप चालविला जातो. या ग्रुपचे ७७ हजाराच्या जवळपास सदस्य आहे. या ग्रुपने अशा संकटाच्या काळात गरीब व गरजवंताच्या मदतीसाठी पाऊल उचलले आहे. हा ग्रुप त्या लोकांना मदत करतोय, जे रोज कमावून आपले घर चालवितात. रोजगार नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या ग्रुपला शोएब मेमन लीड करीत आहे. ग्रुपच्या माध्यमातून गरिबांना एक कीट उपलब्ध करून दिली जात आहे. त्यात सर्व आवश्यक साहित्य आहे.

काय आहे कीटमध्ये ?
शोएब मेमन ने या कीटमध्ये ५ किलो तांदूळ, ५ किलो कणिक, १ किलो तूरडाळ, १ किलो मूगडाळ, १ किलो मीठ, हळद, तिखट व धणे पावडरचे १०० ग्रामचे पॅकेट्स आहे. १ लिटर तेल, १ लिटर हॅण्डवॉश, १ किलो साखर, १०० ग्राम चायपत्ती, १ किलो पोहे, १ किलो आलू व १ किलो कांदे आहे.

तुम्ही सुद्धा करू शकता मदत
या ग्रुपला तुम्ही सुद्धा मदत करू शकता. तुम्हाला असे गरजवंत कुटुंब आढळल्यास शोएब मेमन यांना कॉल करून माहिती देऊ शकता. सोबतच तुम्ही फेसबुकवर सुद्धा माहिती देऊ शकता.

सुरक्षेची काळजी घेतली जाते
शोएब म्हणाले की कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता आरोग्य विभागाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यात येत आहे. कीटचे पॅकिंग करताना मास्क लावण्यात येतो. सॅनिटायझरने हात सुद्धा धुतले जातात.

- मोकाट जनावरांचीही काळजी

सध्या रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे भुकेने व्याकुळ झाली आहे. त्यांच्यासाठी अ‍ॅनिमल केअर फाऊंडेशन, डब्ल्यूओआरआरसी नागपूर, पीपल फॉर अ‍ॅनिमलच्या कार्यकर्त्यांनी स्वत: चपाती बनवून या प्राण्याची भूक शमविण्याचा प्रयत्न केला आहे. प्राणीप्रेमी आशिष कोहळे, स्वप्निल बोधाणे, प्रज्वल बन्सोड, लोकेश भलावी, नीलेश रामटेके, सोनू मंडपे, संजय टोपरे, कैलाश केसरवाणी, गोलू शाहू, अंजली वैद्य, आशिष राहेकवाड या युवकांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला आहे.

 

Web Title: Humanity is the specialty of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.