माणुसकीचा गहिवर :
By Admin | Updated: August 11, 2015 03:28 IST2015-08-11T03:28:10+5:302015-08-11T03:28:10+5:30
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचं दु:ख ऐकून अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेही गहिवरले.

माणुसकीचा गहिवर :
माणुसकीचा गहिवर : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचं दु:ख ऐकून अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेही गहिवरले. वसंतराव देशपांडे सभागृहात सोमवारी ‘जनमंच’तर्फे आयोजित ‘एका साध्या सत्यासाठी’ कार्यक्रमात मनोगत व्यक्त करण्यासाठी कविता सिडाम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला मुलीला घेऊन व्यासपीठावर आली. तिने बोलायला सुरुवात केली अन् तिची मुलगी रडायला लागली. तिचे रडणे ऐकून साऱ्या सभागृहाला गहिवर दाटून आला. शेवटी एक कार्यकर्ता या मुलीला व्यासपीठामागे घेऊन गेला. पण तिचे रडणे थांबत नव्हते. शेवटी मनोगत अर्धवट सोडून तिची आईही धावत गेली. नानाही सोबत गेले आणि त्या चिमुकलीला बिस्कीट, चॉकलेट दिले अन् पुन्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.(वृत्त पान/२)