शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

Viedo : नागपूरमध्ये अग्नितांडव; कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत भीषण आग, कोट्यवधींची मिरची जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2022 11:16 IST

व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

नागपूरयेथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी पहाटे २ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत बाजारसमितीत ठेवण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची मिरची जळून खाक झाली.  दरम्यान, काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

कळमना कृषी बाजार समितीमधील एका यार्डमध्ये आज पहाटे २ च्या सुमारास अचानक आगीचे लोळ उठू लागले. बाब लक्षात येताच लोकांनी आरडाओरड सुरू केली. पाहता-पाहता आगीने मोठे रुप धारण केले. या यार्डमध्ये ४ हजारांच्या जवळपास भरलेले पोते होते. यात प्रामुख्याने ७ ते १०  अडतीया व व्यापाऱ्यांचा माल होता. यात जवळपास ५ कोटींचे नुकसान झाल्याचे समजते. सकाळी ८ वाजेपर्यंत आग विझविण्याचे कम सुरू होते.

वेळीच घटना स्थळावर १० फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचल्या व आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, यात व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये बाजार समिती प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला होता. अचानक एकाचवेळी आग कशी लागू शकते? यामागचे नेमके कारण काय, अशा विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. या आगीला कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदार असून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर