कसा होणार नगरविकास?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:42 IST2021-02-05T04:42:27+5:302021-02-05T04:42:27+5:30
खापा : सावनेर तालुक्यातील खापा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा फटका सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण ...

कसा होणार नगरविकास?
खापा : सावनेर तालुक्यातील खापा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा फटका सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण देत येथे सामान्य नागरिकांचे कामे पेडिंग ठेवण्यात येत आहे. खापा ही तालुक्यातील महत्त्वाची नगरपालिका आहे. खापा शहराचा गत दहा वर्षात मोठा विस्तार झाला आहे. त्यामुळे वाढत्या नागरीकरणासोबत येथील नागरी प्रश्नही वाढले आहेत. या प्रश्नांना दाद मागण्यासाठी नागरिकांना नगरपालिकेचा उंबरठा ओलांडावा लागतो. मात्र कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने नागरिकांची कामे वेळेत होत नाही. पालिकेत सध्या १५ पदे रिक्त आहेत. यात वरिष्ठ लिपिक (२), लिपिक टंकलेखक (३), वाहन चालक (१), उद्यान विभाग (१), ड्रायव्हर ऑपरेटर (१), गाळणी चालक (१), पंपचालक (१), फायरमन (४) आणि तारतंत्रीच्या एका पदाचा समावेश आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.