विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळणार कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:09 IST2021-04-04T04:09:08+5:302021-04-04T04:09:08+5:30
ब्रिजेश तिवारी लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासाेबतच विविध खेळांमध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी इयत्ता दहावी व ...

विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळणार कसे?
ब्रिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासाेबतच विविध खेळांमध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी क्रीडा गुण दिले जातात. काेराेना संक्रमणामुळे वर्षभरापासून शालेय क्रीडा स्पर्धांचे आयाेजनच करण्यात आले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना यावर्षी क्रीडा गुण कसे आणि काेणत्या आधारावर दिले जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी २० क्रीडा गुण दिले जातात. काेराेना संक्रमणामुळे वर्षभरापासून शाळा बंद असून, शालेय क्रीडा स्पर्धांचेही आयाेजन करण्यात आले नाही. स्पर्धाच घेण्यात न आल्याने विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्याचा प्रस्ताव तयार करून ताे वरिष्ठांकडे पाठवायचा कसा, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनासमाेर निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, क्रीडा गुण मिळत असल्याने अनेक विद्यार्थी नियमित अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्यासाेबतच त्यांच्या आवडीच्या खेळांमध्ये इयत्ता आठवीपासून सहभागी हाेतात आणि नियमित सरावदेखील करतात. काेराेनामुळे या विद्यार्थ्यांवर क्रीडा गुण मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
...
खेळाची उज्ज्वल परंपरा
काेंढाळीला खेळ व खेळाडूंची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. शालेय विद्यार्थ्यांनी मागील २५ वर्षांत या परंपरेत आणखी भर टाकली आहे. यात काेंढाळी येथील लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू अग्रणी आहेत. या शाळेतील ५० ते ६० खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धा तर, ५ ते ७ खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी हाेतात. सन २०१८-१९ मध्ये या शाळेतील ६० खेळाडूंनी विविध खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर जिल्ह्याचे तर, सहा खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
...
संगीत, चित्रकलेचे सवलत गुण
एक ते दीड वर्षापासून कोणत्याही क्रीडा स्पर्धेचे आयोजन झाले नाही. त्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुणापासून वंचित राहावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा गुणाप्रमाणेच संगीत व चित्रकलेचेही सवलत गुण मिळतात. संगीत व चित्रकलेची परीक्षा कोणत्याही वर्षी दिली तरी त्याचे सवलत गुण मिळतात. त्यासाठी दहावी व बारावीच्या वर्षीच सहभागाची अट नसते. क्रीडा सवलत गुणासाठी ही अट आहे. त्यामुळे विद्यार्थी इयत्ता आठवीपासून विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी हाेतात. त्यांना क्रीडा गुणापासून वंचित ठेवणे हे अन्यायकारक आहे, अशी प्रतिक्रिया दुधाळा (ता. काटाेल) येथील त्रिमूर्ती विद्यालयातील क्रीडा शिक्षक राजेंद्र खामकर यांनी व्यक्त केली.