शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

८० हजार कर्मचाऱ्यांची चाचणी चार दिवसात कशी होणार ? व्यापारी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 22:20 IST

मनपाच्या कोरोना चाचणीच्या आदेशावर व्यापारी नाराज असून त्यांच्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक नुकसान सोसावे लागत असलेल्या व्यापाऱ्यांना कोरोना चाचणीचे आदेश देऊन संकटाच्या खाईत लोटले आहे. ही चाचणी व्यापाऱ्यांना बंधनकारक नकोच, अशी मागणी विविध व्यापारी संघटनांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

ठळक मुद्देकोरोना चाचणी बंधनकारक नकोच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपाच्या कोरोना चाचणीच्या आदेशावर व्यापारी नाराज असून त्यांच्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक नुकसान सोसावे लागत असलेल्या व्यापाऱ्यांना कोरोना चाचणीचे आदेश देऊन संकटाच्या खाईत लोटले आहे. ही चाचणी व्यापाऱ्यांना बंधनकारक नकोच, अशी मागणी विविध व्यापारी संघटनांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.व्यापाऱ्यांना १८ ऑगस्टपर्यंत चाचणी बंधनकारक केली आहे. काही व्यापारी आॅड-इव्हनमध्ये दुकाने बंद असताना चाचणीसाठी मनपाच्या चाचणी केंद्रावर शुक्रवारी सकाळी ९ वाजता गेले असता डॉक्टर हजर नव्हते. अशा स्थितीत नागपुरातील जवळपास ३० हजार दुकाने आणि कार्यरत ७० ते ८० हजार कर्मचाऱ्यांची चाचणी १८ ऑगस्टपर्यंत होणे शक्य नाही. एकाला १० मिनिटे यानुसार लाखावर लोकांची चाचणी करण्यासाठी महिना लागणार आहे. त्यामुळे मनपाने चाचणीची तारीख वाढवून द्यावी. दुसरीकडे मनपाचे अधिकारी तपासणीसाठी आल्यानंतर चाचणी प्रमाणपत्र नसल्यास पुन्हा दंडाचे हत्यार उगारतील. त्याचा त्रास व्यापाऱ्यांना होईल. व्यापाऱ्यांचे मत जाणून न घेता मनपा आयुक्तांनी घेतलेला एकतर्फी निर्णय व्यापाºयांसाठी त्रासदायक ठरत आहे. मनपा केंद्रात चाचणी सहजरीत्या होत नसल्याने व्यापाऱ्यांना खासगी लॅबमध्ये जावे लागेल. याकरिता येणारा खर्च जास्त आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे चाचणी बंधनकारक करू नये, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.दुकानदारांना कोरोना चाचणी केल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दुकाने सायंकाळी ७ नंतर बंद करायला थोडा उशीर झाला तर मनपाचे अधिकारी तब्बल ५ हजारांचा दंड ठोठावतात. त्याला विरोध केल्यास अधिकारी दुकाने बंद करण्याची धमकी देत आहेत. याशिवाय ऑड-इव्हनमुळे व्यापारी आधीच संकटात आहेत. उत्पन्न कमी झाले आहे. अशा स्थितीत दुकानदार स्वत: खर्च करून चाचणी करणे शक्य नाही.मनपाने चाचणी अनिवार्य करू नये. व्यापारी स्वेच्छेने करीत असेल तर त्यावर बंधन असू नये. व्यापारी आर्थिक संकटात असताना त्यांना चाचणीचा खर्च झेपणारा नाही. त्यामुळे व्यापारी आणि कार्यरत कर्मचाऱ्यांना चाचणीचा कालावधी वाढवून द्यावा.कैलास जोगानी, माजी अध्यक्ष नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सआवश्यक वस्तू आणि फार्मसी २४ तास खुले ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानंतरही मनपाचे कर्मचारी दुकानदारांना सायंकाळी ७ वाजता दुकाने बंद करण्यास सांगतात. बंद न केल्यास दंड ठोठावतात. शिवाय कोरोना चाचणीचे तुघलकी आदेश मनपाने दुकानदारांवर थोपवू नयेत. लहान दुकानदारांना शांततेने व्यवसाय करू द्यावा.ज्ञानेश्वर रक्षक, महासचिव , नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघकोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा आदेश मागे घेणे आवश्यक आहे. दुकानदार कोरोनाच्या सर्वच नियमांचे पालन करून व्यवसाय करीत आहे. मास्क, सॅनिटायझरचा वारंवार उपयोग करीत आहेत. व्यापारी आणि कर्मचारी कोरोना निगेटिव्ह असताना कुणी पॉझिटिव्ह ग्राहक दुकानात आला तर व्यापारी काहीही करू शकत नाही. व्यापारी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन व्यवसाय करीत आहे.विष्णू पचेरीवाला, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्सव्यापारी कोरोनाग्रस्त असल्यास दुकान दुसऱ्या दिवशी सुरू होणारएखादा व्यापारी कोरोनाग्रस्त आढळल्यास त्याचे दुकान पूर्णपणे सॅनिटाईज्ड करून त्याचे कुटुंबीय किंवा कर्मचारी दुकान दुसऱ्या दिवशी सुरू करू शकतो, असे आदेश मनपाने काढले आहेत. पूर्वीप्रमाणे आता दुकान सील होणार नाही वा परिसरही सील करण्यात येणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर