शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
6
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
7
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
8
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
9
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
10
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
11
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
12
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
13
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
14
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
15
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
16
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
17
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
18
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
19
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
20
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

गॅस अनुदान बंद करून  अच्छे दिन कसे येणार ? - अनिल देशमुख  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2017 10:56 PM

घरघुती गॅस सिलिंडवर मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच घरघुती सिलिंडरचे भाव 7 रुपयांनी वाढविले आहे. हेच अच्छे दिन आहेत का, असा सवाल करीत अमुदान बंद केले व दरवाढ रद्द केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

नागपूर, दि. 2-  अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. मात्र, सरकारचे लोकहितविरोधी निर्णय घेणे सुरू आहे. केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यत घरघुती गॅस सिलिंडवर मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच घरघुती सिलिंडरचे भाव 7 रुपयांनी वाढविले आहे. हेच अच्छे दिन आहेत का, असा सवाल करीत अमुदान बंद केले व दरवाढ रद्द केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. देशमुख म्हणाले, सध्स्थितीत  एका घरघुती सिंलेडर मागे १५० रुपये अनुदान देण्यात येते. राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेस व काँग्रेसरचे सरकार असतांना मी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा मंत्री असतांना घरघुती गॅसस सिलिंडवर मिळणारे अनुदान  थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करणारी योजना सुरु केली होती.  परंतु आता भाजपा सरकार सामान्य नागरीकांना आर्थिक अडचणीत टाकण्याचे काम करीत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  नागरिकांना आवाहन करून अनुदान  सोडण्याचे आवाहन केले. गरीब कुटुंबाना उज्वला योजनेच्या माध्यमातातून मोफत गॅस कॅनेक्शन देण्यासाठी त्यांनी हे आवाहन केले होते. परंतु याही योजनेच्या माध्यमातून गरीब जनतेला फसविण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. जोपर्यत कनेक्शनचे १६०० रुपये पूर्ण जमा होणार नाही तो पर्यत सिलिंडरची सबसीडी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  गॅस सिलिंडर सारखेच केरोसनीनची सुद्धा सबसिडी बंद करण्याचे सरकारचे धोरण आहे. २०१६ पासुन दर १५ दिवसाला २५ पैसे भाव वाढ करण्यात येत आहे. शिवाय देशातील अनेक भाग केरोसीन मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशातील कोट्यवधी गरिब कुटुंबास याचा फटका बसणार आहे. एकीकडे मोठमोठ्या उद्योगपत्यांचे हजारो करोड रुपयाचे कर्ज माफ करायचे आणि दुसरीकडे गरीब जनतेला देण्यात येणारे अनुदान  बंद करायचे  हे कसले धोरण आहे. भाजपाने सर्व सामान्य नागरीकांना वेठीस धरण्याचे काम सुरु केले असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.