किती ही रडारड... जरा दोन क्षण हसा!

By Admin | Updated: May 3, 2015 02:02 IST2015-05-03T02:02:19+5:302015-05-03T02:02:19+5:30

जगात कुठेही नाही एवढा हास्याचा प्रचंड साठा तुमच्या आमच्या जीवनात आहे.

How much rudder ... laugh for a couple of moments! | किती ही रडारड... जरा दोन क्षण हसा!

किती ही रडारड... जरा दोन क्षण हसा!

मंगेश व्यवहारे नागपूर
जगात कुठेही नाही एवढा हास्याचा प्रचंड साठा तुमच्या आमच्या जीवनात आहे. परंतु तो बघण्याची दृष्टी या रोजच्या तणावाने पार गमावून टाकली आहे. हसायला कुणाला आवडत नाही? पण इथे वेळ कोणाकडे आहे? चार क्षण निवांत मिळतील तर शपथ. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सारखा धावत असतो माणूस. अशा स्थितीत हसायचे म्हटले तरी लोकांच्या जीवावर येते. काही लोकं हसतातही पण रडवेल्या चेहऱ्याने. काय राव...! सुखांच्या मागे धावताना कितीही रडारड? घ्या विसावा एखाद्या वळणावर अन् हसून बघा मनसोक्त. हसल्याने निर्भेळ आनंद मिळतो आणि मनाचे आरोग्यही उत्तम राहते. काय म्हणताय... हसायचे कुठे? अहो, आपल्या नागपुरात एक-दोन नव्हे तब्बल ३२ उद्यानांमध्ये वाटला जातो हा निखळ हास्याचा अमृतमय प्रसाद.
एक जुनी म्हण आहे, आनंदी राहिल्याने आणि खूप हसल्याने, आजार दूर पळतात. देशात जवळपास १०००० वर लाफ्टर क्लब याचे प्रमाण आहेत. खरं पाहता अगदी लहान मूल दिवसात स्वत:शीच ३०० ते ४०० वेळा हसत असतं, आनंदी रहाणं हा त्याचा स्वभावधर्म असतो. ते मोठं होऊन जसजसा जगाचा अनुभव घेऊ लागतं.
साठी गाठलेले सदस्य अधिक
नागपूर : तसंतसं गांभीर्य, स्वयंनियंत्रण, जबाबदारी, भीती, असुरक्षितता यांच्या दडपणाखाली त्याचं हास्य आटू लागत. नेहमीच्या जीवनातले ताणतणाव चिंता यांनी ते मोठं होऊन हसायचं विसरते. परिणामी अनेक रोग त्याला घेरू लागतात. त्यापासून दूर राहण्याचा उपाय म्हणजे खळखळून हसणे. पण एखादा माणूस स्वत:शीच हसतोय असं दृश्य कोणी पाहिलं तर ते त्याला वेडा म्हणतील. त्याला खरोखरच वेड लागू नये असं वाटत असेल तर त्यानं हसलं पाहिजे. नागपुरात पहाटे ३२ उद्यानांमध्ये हास्याचे फवारे अनुभवायला मिळतात. ही मंडळी लाफ्टर क्लबचे सदस्य आहेत. यात मोठ्या संख्येने साठी गाठलेले नागरिक आहेत. रोज एक तास हसल्याने तणाव नियंत्रित राहतो असा त्यांचा अनुभव आहे.

Web Title: How much rudder ... laugh for a couple of moments!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.