ब्रिटीशकालीन पुलावर आणखी किती दिवस गाड्या धावणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST2021-07-19T04:06:53+5:302021-07-19T04:06:53+5:30

पुलाच्या स्लॅबलाही अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे वारंवार डागडुजी करावी लागते. नुकतेच या पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले ...

How many more days will trains run on the British bridge ... | ब्रिटीशकालीन पुलावर आणखी किती दिवस गाड्या धावणार...

ब्रिटीशकालीन पुलावर आणखी किती दिवस गाड्या धावणार...

पुलाच्या स्लॅबलाही अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे वारंवार डागडुजी करावी लागते. नुकतेच या पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनानुसार हा पूल १९२७ साली बांधला गेला हाेता. त्याच काळात रामझुल्याचेही बांधकाम झाले हाेते. मात्र, रामझुल्यावर एवढी वाहतूकही नाही आणि रेल्वेची अधिक रहदारीही नाही. अजनी पुलावरून प्रचंड वाहतुकीसह धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या कंपनाने तुटफूट हाेण्याचा धाेका आहे. असे असताना रामझुल्याचे नूतनीकरण झाले; पण अजनी पूल तसाच राहिला.

२०१३ मध्ये या पुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव मंजूर झाला हाेता व ३७२ काेटी रुपयांची तरतूदही करण्यात आली हाेती. मात्र, पुढे निवडणुकीनंतर पुलाचे काम पुन्हा थंडबस्त्यात गेले. यावेळी अजनी आयएमएस प्रकल्पांतर्गत नव्या पुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे.

नागरिकांचे आंदाेलन ()

नुकतेच तनवीर अहमद यांच्या नेतृत्वात काँग्रेस विचार जनजागृती अभियान मंचतर्फे अजनी पुलाच्या नूतनीकरणासाठी आंदाेलन करण्यात आले. यावेळी ॲड. अशाेक यावले, दिनेश वाघमारे, नरेश खडसे, प्रकाश साळुंखे, आनंदसिंग ठाकूर, राजू जीवने, मच्छिंद्र सावळे, सूर्यकांत उईके, सूरज चाैकीकर, साेहन पटेल, शिरीष तिवारी, ताराचंद हाडके, किसन निखारे, मनाेज काळे, नसीम अनवर, राजू मिश्रा, संजय भंडारे, सुरेश बाभूळकर, दिलीप कैथवास, राकेश गगाेलिया, अजय बागूल, गुड्डू पाल, ॲन्थाेनी राॅक, भीमराव हाडके, शरद बाहेकर, माेहम्मद अतहार आदींचा सहभाग हाेता.

Web Title: How many more days will trains run on the British bridge ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.