शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
2
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
5
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
6
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
7
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
8
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
9
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
10
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
11
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
12
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
13
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
14
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
15
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
16
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
18
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
19
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
20
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

पेट्रोलच्या नावावर किती लुटणार शासन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 3:33 PM

शहरातील रस्त्यांचे हाल सर्वांनाच माहीत आहेत. नागपूरला खड्डेपूरही संबोधण्यात येत आहे. या परिस्थितीत तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, आपण पेट्रोल-डिझेलच्या खरेदीच्या वेळी रस्त्याच्या नावाने शासनाची तिजोरी भरत आहोत. शासनाने सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचा वापर शस्त्राच्या रूपाने सुरू केला आहे.

ठळक मुद्देरस्त्याच्या नावाने राज्य अन् केंद्र शासनाची मोठी वसुली

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रस्त्यांचे हाल सर्वांनाच माहीत आहेत. नागपूरला खड्डेपूरही संबोधण्यात येत आहे. या परिस्थितीत तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, आपण पेट्रोल-डिझेलच्या खरेदीच्या वेळी रस्त्याच्या नावाने शासनाची तिजोरी भरत आहोत. शासनाने सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचा वापर शस्त्राच्या रूपाने सुरू केला आहे.अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना पेट्रोल-डिझेलवर आयात कर कमी करून पेट्रोल-डिझेलचे दर प्रति लिटर २ रुपये कमी करण्याची घोषणा केली. परंतु यासोबतच २ रुपये अप्रत्यक्षरीत्या वाढविण्यात आले आहेत. शासनाने त्यासाठी सेंट्रल रोड सेसचा आधार घेऊन डिझेलवर ६ रुपये प्रति लिटर वाढवून ८ रुपये केले. सोबतच त्याचे नाव बदलवून रोड अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केले. याच प्रकारे पेट्रोलवरही सेस ४.४८ रुपयांवरून वाढवून ६.४८ रुपये केले आहे.२००२ मधील रस्त्यांसाठी आतापर्यंत वसुलीपेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर केंद्र शासनासोबत राज्य सरकारही आपली तिजोरी भरीत आहे. शहरात २००२ मध्ये आयआरडीपीअंतर्गत तयार केलेल्या रस्त्यांची किंमत सामान्य नागरिक पेट्रोल-डिझेल घेताना आतापर्यंत चुकवीत आहेत. पूर्वी १ रुपये प्रति लिटर वसुली होत होती. २०१५ मध्ये वसुलीची मुदत संपल्यानंतर शासनाने पेट्रोलवर ३ टक्के आणि डिझेलवर १ टक्का केली. यात काहीच माहिती नसताना सामान्य नागरिकांच्या खिशाला ताण पडत आहे.हायवे तयार करण्याचा खर्चही सामान्य नागरिक टोलनाक्यावर पैसे देऊन देत आहेत. दोन टोलनाक्यात ६० किलोमीटरचे अंतर असावयास हवे. परंतु अमरावतीवरून भंडाºयाच्या साकोलीदरम्यान २५० किलोमीटरचा प्रवास कुणी करीत असेल तर त्याला नांदगाव, कारंजा, गोंडखैरी, जामठा, मौदा, भंडारा, साकोली अशा सात ठिकाणी टोल द्यावा लागत आहे. जर एक ट्रक या मार्गाने जात असेल तर त्यास एकूण ४७५ रुपये द्यावे लागतात.इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक व्हॅटमहाराष्ट्रात पेट्रोलवर ४०.७१ टक्के आणि डिझेलवर २४.९४ टक्के व्हॅट वसूल करण्यात येतो. हे दर देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहेत. इतर काही राज्यात आंध्र प्रदेश ३६.४२, अरुणाचल प्रदेश २० टक्के, आसाम ३०.७२, बिहार २४.५७, छत्तीसगड २७.४०, दिल्ली २७, गोवा १६.५७, गुजरात २५.४२, कर्नाटक २८.२४, मध्य प्रदेश ३५.२३ आणि तेलंगणा ३३.१२ टक्के व्हॅट आहे.दारुबंदीचाही परिणामराज्य शासन पेट्रोलवर प्रति लिटर नऊ रुपये सेस घेत आहे. मार्च २०१५ पासून हा सेस दुष्काळग्रस्तांच्या मदतीच्या नावाने पेट्रोलवर सरू करण्यात आला. त्यानंतर तो लागोपाठ वाढत आहे. हाय वे वर दारुबंदी लागू झाल्यानंतर राज्य शासनाच्या महसुलात होणाऱ्या  नुकसानाच्या भरपाईसाठी तो वाढवून ११ रुपये प्रति लिटर करण्यात आला. आॅगस्ट २०१७ मध्ये राज्य शासनाने त्यातील दोन रुपये कमी करून नऊ रुपये केले.

टॅग्स :Petrolपेट्रोलRobberyदरोडा