शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीचा दर्जा मग ग्रा.पं.ची निवडणूक कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 11:50 IST

निलडोह, डिगडोह, कोंढाळी, बिडगाव-तरोडी येथील निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह

नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्ह्यातील २६५ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यातील चार ग्रामपंचायतींना नगर पंचायत, नगर परिषदेचा दर्जा देण्यासाठी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, अंतिम अधिसूचना बाकी आहे. यात डिगडोह ग्रामपंचायतीला नगर परिषद, तर निलडोह, कोंढाळी, बिडगाव-तरोडी या तीन ग्रामपंचायती नगर पंचायत होतील. त्यामुळे येथे ग्रामपंचायतीची निवडणूक होणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

या ग्रामपंचायतींना नगर पंचायत आणि नगर परिषदेचा दर्जा देण्याबाबतची अंतिम अधिसूचना एक-दोन महिन्यांत निघाल्यास ग्रामपंचायत बरखास्त होईल. त्यामुळे येथे आता निवडणूक झाल्यास सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द होईल व निवडणुकीवरील खर्चही वाया जाईल.

जिल्हाधिकाऱ्यांना भेटले शिष्टमंडळ

कोंढाळी नगरपंचायत संदर्भात बुधवारी काटोल येथील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच शासनाचे लक्ष वेधण्याची विनंती केली. कोंढाळी ग्रामपंचायत करण्याबाबत २१ जून २०२३ रोजी पहिली अधिसूचना काढण्यात आली. यामध्ये नागरिकांचे आक्षेप आणी हरकती लेखी स्वरूपात मागविण्यात आले, पण एकही आक्षेप व हरकती न आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १४ ऑगस्ट २०२३ रोजी उपसचिव नगरविकास विभाग यांच्याकडे प्रस्ताव पाठविला, परंतु शासनाने अधिसूचना न काढल्यामुळे निवडणूक लागली. त्यामुळे नामनिर्देशन पत्र भरणे १६ तारखेपासून सुरू होत आहे. त्याआधी जर नगरविकास विभागाकडून अधिसूचना काढली, तर कोंढाली नगरपंचायत होऊ शकते, असे या शिष्टमंडळाचे म्हणणे होते. शिष्टमंडळात काटोल पंचायत समितीचे उपसभापती निशिकांत नागमोते, समीर उमप जि. प. सदस्य, प्रकाश वसू, राजू हरणे; सतीश शिंदे, नरेश अरसडे यांचा समावेश होता.

नगर विकास विभागाची अंतिम अधिसूचना अद्याप निघाली नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे प्रशासनाकडून कार्यवाही होत आहे. संबंधित ग्रामपंचायतीसंदर्भात संदर्भात काहींनी विचारणा केली आहे. त्याअनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविण्यात येईल.

- सचिन गोसावी, उपजिल्हाधिकारी, ग्रामपंचायत निवडणूक विभाग

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकnagpurनागपूर