शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मी बंडखोरांचा नेता कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 20:50 IST

ज्या कारणांचा हवाला देत मला पक्षातून निष्कासित करण्यात आले याचा आधी पुरावा द्या. मी कोणत्याही काँग्रेस बंडखोर उमेदवाराचा प्रचार केला नाही. त्यामुळे त्यांचा नेता होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पलटवार माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी रविवारी केला.

ठळक मुद्दे सतीश चतुर्वेदींचा पलटवार : काँग्रेसचा गड उद्ध्वस्त करण्याचा डाव

लोकमत न्युज नेटवर्क  

नागपूर :ज्या कारणांचा हवाला देत मला पक्षातून निष्कासित करण्यात आले याचा आधी पुरावा द्या. मी कोणत्याही काँग्रेस बंडखोर उमेदवाराचा प्रचार केला नाही. त्यामुळे त्यांचा नेता होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पलटवार माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी रविवारी केला.प्रदेश कॉँग्रेसने दोन दिवसांपूर्वी पक्षातून निष्कासित केल्यानंतर चतुर्वेदी यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. नागपूर व मुंबईतील मूठभर नेत्यांनी व्यक्तिगत स्वार्थ व जातीयवादी शक्तींना अधिक बळ देण्याच्या उद्देशाने माझ्याविरुद्ध षड्यंत्र रचले आहे. या वादात काँग्रेसचा गड उद्ध्वस्त होतो आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पक्षातून गेलेले नेते आणि कार्यकर्त्यांना स्वगृही आणण्याचे प्रयत्न होत असताना प्रदेश कॉँग्रेसने माझ्यावर कारवाई करून नेमके काय साधले, असा सवालही चतुर्वेदी यांनी केला.  पक्षातून निष्कासित करण्यात आल्याचे प्रदेश काँग्रेसचे कुठलेही पत्र मिळाले नाही. त्यामुळे मी ५२ वर्षांपासून काँग्रेसमध्ये आहे आणि पुढेही राहील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.नागपुरात यापूर्वीही प्रतिस्पर्धी आणि बंडखोरांना अनेक नेत्यांनी बळ दिले आहे. त्यामुळेच पश्चिम, पूर्व आणि उत्तर नागपूरसारखे काँग्रेसचे मजबूत किल्ले निवडणुकात ढासळले. त्यावेळी कुणी कुणाला मदत केली, याची सर्वांना कल्पना आहे. ज्यांना पक्षांकडून काहीच नको आहे, त्यांना पक्षातून काढून काहीही उपयोग होणार नाही. मी बंडखोरांचे समर्थन केल्याची कोेणतीही नोटीस अजूनही प्रदेश काँग्रेसने पाठविलेली नाही. त्यामुळे एकहाती कारभार असलेल्या शहर काँग्रेसच्या अहवालावर मला पक्षातून निष्कासित करण्यात आल्याबद्दल पक्षश्रेष्ठींकडे नैसर्गिक न्याय मागणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. महापालिकेचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी आमदार अशोक धवड यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :nagpurनागपूरcongressकाँग्रेस