शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील दूषित नाग नदी फायलींमध्ये स्वच्छ कशी झाली ? १९२७ कोटी खर्च करून प्रदूषणमुक्त झाल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:52 IST

मंजुरीला तीन वर्षे, पण अजून प्रकल्पाला सुरुवातच नाही : १९२७ कोटी खर्चुनही घाणीचा प्रवाह कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गतकाळात उपराजधानीची ती जीवनवाहिनी असलेली नाग नदी घाण, सांडपाणी आणि कचन्याने गुदमरतेय. मात्र, सरकारी फायलींमध्ये प्रदूषणमुक्त झाल्याचे दाखवण्यात आले आहे. नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला प्रत्यक्षात सुरुवातच झालेली नाही, मग नाग नदी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) २०२५च्या अहवालात 'स्वच्छ' कशी ठरली, असा सवाल शहरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि तज्ज्ञ विचारत आहेत.

अंबाझरी तलावापासून ते पावनगावपर्यंत फेरफटका मारला असता नाग नदीचा प्रवाह आजही सांडपाण्याने काळवंडलेला आहे. पावसाळ्यापूर्वी कचरा काढण्यापुरतेच काम करण्यात आले. पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. ना मलनिस्सारण केंद्रे, ना नवीन सिवरेज लाइन्स जोडल्या गेल्यात. तरीही पर्यावरण विभागाच्या अहवालात सर्वाधिक प्रदूषित नद्यांच्या यादीतून नाग नदीचे नाव वगळले गेले आहे. हे कसे शक्य आहे, असा थेट सवाल नागपूरकर विचारत आहेत.

सार्वत्रिक निवडणुका आल्या की सत्ताधाऱ्यांना नागपूरच्या नाग, पिवळी नदीची आठवण येते. यातूनच प्रदूषित नद्यांच्या यादीतून नाग नदीला वगळण्यात आले असावे, अशा भावना नदी काठावरील लोकांनी व्यक्त केल्या.

नदीचा प्रवाह सांडपाण्याचाच

नागपुरातील सिवरेज नाग व पिवळी नदीत प्रक्रिया न करताच सोडण्यात येते. त्यातच कारखान्यातील दूषित पाणी सोडले जाते. ते रोखण्यासाठी अद्याप उपाययोजनांना सुरुवात झालेली नाही. यात मलनिस्सारण केंद्रांची उभारणी व प्रक्रिया केंद्राला सिवरेज लाइन जोडण्यापूर्वीच नदी प्रदूषणमुक्त झाल्याचा चमत्कार झाला आहे.

नीरीचा अभ्यास, अहवाल गेला कुठे ?

नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटला नाग नदीचे प्रदूषण मोजण्याचे आणि सुधारणा योजना तयार करण्याचे काम दिले गेले होते. पण, त्या अभ्यासाचा पुढचा टप्पा कुठे गेला, कोणत्या उपाययोजना राबवल्या गेल्या आणि काय परिणाम झाला. याचे स्पष्ट उत्तर आजवर कोणाकडेच नाही. नदी प्रदूषणावर उपाय करण्यासाठी नीरीचे वैज्ञानिक जे अहवाल तयार करतात, ते सरकारी फायलींमध्ये धूळखात पडतात. नाग नदीचा प्रकल्पाबाबतही असेच घडले असावे, अशी चर्चा आहे.

तीन वर्षे झाली कामाचा पत्ता नाही

केंद्र सरकारने २०२२ मध्ये तब्बल १,९२७ कोटी रुपयांचा नाग नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प मंजूर केला होता. जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीच्या निधीतून होणारा हा प्रकल्प आठ वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असताना, महापालिकेने तो पाच वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प केला होता. पण तीन वर्षे उलटली, आणि कामाचा मुहूर्तही निघालेला नाही.

नाग नदी शुद्धीकरण प्रकल्पाचे वास्तव

प्रकल्प मंजूर : २०२२एकूण किंमत : १९२७ कोटीकालावधी : ८ वर्षे (महापालिकेचे लक्ष्य-५ वर्षे)प्रगती : शून्यस्थिती : नदी अजूनही प्रदूषित, सांडपाण्याने भरलेली 

English
हिंदी सारांश
Web Title : Nag River in Nagpur: Clean on paper, polluted in reality.

Web Summary : Despite claims of pollution cleanup with ₹1927 crore spent, Nagpur's Nag River remains heavily polluted. Citizens question how it's deemed 'clean' in reports when sewage still flows freely and projects stall, highlighting a gap between official records and the river's state.
टॅग्स :riverनदीwater pollutionजल प्रदूषणCorruptionभ्रष्टाचारnagpurनागपूर